BREAKING NEWS
Search

मुरबाड नगराध्यक्षपदी मुकेश विशे यांची बिनविरोध निवड

510

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड नगरपंचायत  सातव्या नगराध्यक्षपदी मुकेश विशे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांची मुरबाड नगरपंचायत कार्यालयापासून शहरात वाजत गाजत मिरवणूक काढून शुभेच्छा देण्यात आल्या. मुरबाड नगरपंचायत स्थापने पासुन आठ वर्षात मुकेश विशे हे सातवे नगरध्यक्ष असुन, नगरपंचायतवर एकहाती भाजप व आमदार किसन कथोरे यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याने आतापर्यंत सात नगरसेवकांना नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळण्याची संधी मिळाली. नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने रामभाऊ दुधाळे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यामुळे रिक्त नगराध्यक्ष पदाचा प्रभारी कारभार मानसी देसले यांनी सांभाळला. नगराध्यक्ष पदी आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष होणार है निच्छित असल्याने नगराध्यक्ष पदासाठी फक्त मुकेश विशे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आज झालेल्या निवडणुकीत मुकेश विशे यांना बिनविरोध नगराध्यक्ष घोषित करण्यात आले.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *