BREAKING NEWS
Search

मुरबाड तालुक्यातील 29 ग्रामपंचायत निवडणूकीत 10 सरपंच तर 150 सदस्य बिनविरोध

435

उर्वरित जागांसाठी 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील 29 ग्रामपंचायत निवडणूक येत्या 5 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. या निवडणुकीत 29 पैकी 10 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाल्याची माहिती मुरबाड निवडणूक विभागाकडून देण्यात आली असून, 29 ग्रामपंचायत मध्ये 150 सदस्य हि बिनविरोध झाल्याचे सांगण्यात आले.
29 ग्रामपंचायत निवडणूकी साठी 405 एकूण अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी आता सदस्य पदासाठी 119 उमेदवार रिंगणात आहेत. तर 19 सरपंच पदासाठी 43 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहे. उमेदवारी माघारीच्या दिवशी 128 अर्ज माघारी घेण्यात आले. या 29 ग्रामपंचायत निवडणुकीत सोनावळा, काचकोली, सोनगाव, कोरावळा, माजगाव, तळवली बा.मानिवली खू!! कासगावं, अस्कोत व टोकावडे या ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध तर एकूण 150 सदस्य बिनविरोध झाल्याने उर्वरीत 19 सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून आगामी काळात या निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवारांवर कोणते राजकीय पक्ष दावा करतात हे येत्या 6 नोव्हेंबर च्या निकाला नंतरच कळणार आहे . मात्र यातील मोठ्या प्रमाणात बिनविरोध करण्यात ग्रामस्थ मंडळींना यश आल्याने आगामी काळात कुणाचे वर्चस्व वाढते व कुणाचे घटते हे पहायला मिळणार आहे.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *