नीरा नरसिंहपूर, ता. इंदापूर : गार अकोले तालुका माढा येथे सालाबाद प्रमाणे लक्ष्मण शक्ती सोहळा साजरा

537

नीरा नरसिंहपूर, ता. इंदापूर (  -प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार ) :  गार अकोले तालुका माढा येथे सालाबाद प्रमाणे लक्ष्मण शक्ती सोहळा साजरा करण्यात येतो. श्री क्षेत्र स्वामी महाराज मंदिर यांच्या पावन भूमीमध्ये हजारोच्या संख्येने वारकऱ्यांचा जनसमूह टाळ-मृदुंगाच्या सहवासात साजरा होत असतो.  स्वामी महाराज हे जागृत देवस्थान असून या पुण्यभूमी मध्ये संपूर्ण रामायण ग्रंथाचे पारायण केले जाते व भाविक भक्त वनवासाला जाण्यासाठी सज्ज होऊन गारा कुले ते आयोध्या नगरी पर्यंत श्रीरामाच्या जन्मभूमी तपोभूमी नाशिक त्रिंबकेश्वर मुक्काम दर मुक्काम देवस्थानला भेटी देऊन दर्शन घेऊन आपले मनोकामना पूर्ण करतात. पंचवटी पासून पायी दिंडी सोहळा राम भक्त मुक्काम दर मुक्काम करत शेवटी पंढरपूर विठ्ठलाच्या मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेऊन पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे मुक्कामस आली असता पिंपरी गावचे ह.भ.प बाळासाहेब घाडगे महाराज, शरद बोडके, महेश सुतार, महादेव सुतार, तेजस बोडके तसेच,  पिंपरी बुद्रुक मधील सर्व ग्रामस्थांनी रामभक्त सोहळ्याचे स्वागत केले. गारा कुले ते अयोध्या सोहळ्यमध्ये प्रमुख ह भ प श्रीमंत कृष्णा भोसले महाराज व त्यांचे सर्व सहकारी भाविक भक्त हे मोठ्या आनंदाने रामभक्त दिंडी मध्ये सामील होऊन आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी सज्ज राहतात. ही परंपरा गेले 21 वर्षापासून चालत आलेली असून, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत, भाविक, भक्त यांसह स्वामी महाराज मंदिरामध्ये लक्ष्मण शक्ती सोहळा संपन्न होत असतो.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *