नरसिंह जयंती निमित्त पंचामृत आणि बहुमान अभिषेकाने तसेच पवमान पंचसूक्त अभिषेकाने पूजेची सुरवात

604
नीरा नरसिंहपूर, ता. इंदापूर (  -प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार ) : नरसिंह जयंती निमित्त पंचामृत आणि बहुमान अभिषेकाने तसेच पवमान पंचसूक्त अभिषेकाणे पूजेची सुरवात करण्यात आली. अलंकार पूजा बांधून श्रीनाथ आकर्षक रित्या सजवण्यात आले आहे. यानिमित्ताने सायंकाळी पाच वाजता हरिभक्त परायण गरवारे सर यांचे कीर्तन झाले असून , सायंकाळी सात वाजता श्रींचा जन्माचा साजरा करण्यात आला. भारतभरातून तसेच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भक्त नरसिंगपूर क्षेत्री आले होते. अन्नछत्र मंडळाच्या वतीने आलेल्या भक्तांसाठी मोफत फराळाची व्यवस्था केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *