प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा अंतर्गत उपकेंद्र पिंपरी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन

1448
नीरा नरसिंहपूर ता. इंदापूर (  -प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार ) : पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा अंतर्गत उपकेंद्र पिंपरी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी, थायरॉईड, शुगर, कॅन्सर, हिमोग्लोबिन अशा अनेक प्रकारच्या तपासण्या व उपचार आरोग्य केंद्रामार्फत करण्यात आले. यानिमित्त आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीयअधिकारी डॉक्टर कपिल कुमार वाघमारे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
डॉक्टर कपिल कुमार वाघमारे पुढे म्हणाले की,  ” शिबिरांमधून मोफत सेवा केली जाते. गोर गरीब व गरजू रुग्णांना अडचणी नेहमीच असतात म्हणून केस पेपर काढून रक्ततपासणी, थायरॉईड, शुगर, कॅन्सर, हिमोग्लोबिन यांसारख्या आजारांची तपासणी व ताबडतोब उपचार करण्यासाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत शिबिराची व्यवस्था केली आहे. ” 
पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस ए कोकाटे मॅडम म्हणाल्या की, ” ही जी सेवा गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी बावडा अंतर्गत पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्रामार्फत मोफत तपासणी केली जात आहे. मोठ्या आजारांना रुग्णांना सामोरे जावे लागत असल्यामुळे हिमोग्लोबिन, कॅन्सर, थायरॉईड अशा आजारांच्या तपासण्या या आरोग्य शिबिरामध्ये मोफत केल्या जातील. “
या कार्यक्रमांतर्गत पिंपरी बुद्रुक गावचे सरपंच आबासाहेब बोडके, उपसरपंच जाहीराती शेख, ग्राम सेवक बळीराम शिंदे, माजी सरपंच संतोष सुतार, दत्तात्रेय बोडके, हनुमंत सुतार, किशोर सुतार, लालासाहेब शेख, शिवाजी गायकवाड, अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक प्रेम सिंह माने व इतर कर्मचारी वृंद व इंदापूर आरोग्य अधिकारी उपस्थित सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी, सेविका व अंगणवाडी सेविका तसेच रफिया तांबोळी, सीमा सुतार, सुरेखा पाटील, स्वाती पाटील, सारिका वाघमारे, सुरेखा शिरसागर, शितल रस्ते यांच्या सहकार्याने पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत रक्त तपासणी व इतर कोणत्याही रोगांच्या तपासण्या व उपचार प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा अंतर्गत उपकेंद्र पिंपरी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने हे तपासणीचे व तपासल्यानंतर गोळ्या औषध देऊळ रुग्णांना दिलासा देण्यात आला.आरोग्य केंद्र पिंपरी बुद्रुक शिबिराचे सूत्रसंचालन महेश सुतार यांनी केले तर, पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर कोकाटे मॅडम यांनी आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *