BREAKING NEWS
Search

प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत अनुदानित आश्रम शाळा तळवली शाळेचे घवघवीत यश

421
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत किर्तीमान इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन नाशिक संचलित अनुदानित आश्रमशाळा तळवली या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध खेळांमध्ये बाजी मारून चॅम्पियन ट्रॉफी मिळवत सलग सातव्यांदा हा बहुमान पटकावण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दि. 19 ते 22 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये शहापूर तालुक्यातील शेंडेगाव इंग्लिश मीडियम शाळेत आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये  शहापूर प्रकल्पाअंतर्गत अनुदानित व शासकीय अशा एकूण 36 आश्रमशाळा व 2500 आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, हँडबॉल, धावणे, रिले, लांबउडी, उंचउडी, भालाफेक, गोळा फेक अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व खेळाडु विद्यार्थींनी आपले सर्व कौशल्य पणाला लावुन खेळ खेळत तळवली आश्रम शाळेने 12 सांघिक व 21 वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत पारितोषिक मिळवले व सर्वाधिक पारितोषिक मिळवल्याचा बहुमान मिळवला
 या स्पर्धांमध्ये अनेक चुरशीचे सामने पहायला मिळाले. किर्तीमान इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन नाशिक संस्थेचे अध्यक्ष मनोज बेलदार यांच्या नेतृत्वात आश्रमशाळेचे मुख्याध्यापक  योगेंद्र वेखंडे व काळुराम विशे यांनी तळवली शाळेचे नियोजन केले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर चे प्रकल्प अधिकारी  राजेंद्रकुमार  हिवाळे  ,स.प्र.अधिकारी श्रीमती. गलांडे मॅडम, जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे, लेखा अधिकारी वेखंडे, विविध शाळांचे सन्माननीय मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आश्रमशाळेच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी संपादन  केलेल्या या घवघवीत यशाचे संपूर्ण शहापूर  मुरबाड तालुक्यामध्ये तळवली आश्रमशाळेचे कौतुक केले जात आहे. यावेळी नागरीकांनी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सामने बघण्यासाठी मैदानात गर्दी केली होती.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *