कुंटुबाच्या जडणघडणीत आईचे योगदान खुप मोठे असते – रामायणाचार्य ज्ञानेश्वर रासकर महाराज

175

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : आई ही मायेचा सागर आहे. रामायणाचार्य रासकर महाराज त्यानी  केले मत व्यक्त कासारी ता.शिरुर येथे कै .सोनुबाई विष्णू साबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त वर्षश्राद्धानिमित्ताने किर्तन सेवेचा आयोजन करण्यात आले. झी टॉकीज फेम रामायणाचार्य ज्ञानेश्वर रासकर महाराज (रामलिंग शिरुर) यांचे किर्तन झाले. अडीच तासाच्या सेवेमध्ये त्यांनी आई विषयीचे महात्माय सांगितले. कुंटुबाच्या जडणघडणीत आईचे योगदान खुप मोठे असते.आयुष्यभर काळ्या आईची सेवा करत असताना परमार्थ केला. यावेळी कार्यक्रमाला कासारीचे लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ, गणपतराव काळकुटे, सदिप रासकर, अनिल नवले, भाजपाचे कोषाध्यक्ष पंढाभाऊ गायकवाड, फायनल सम्राट सुखदेव भुजबळ, शिरुर ग्रामीण माजी उपसरपंच सुरेश रासकर, तबन भुजबळ, संजय भुजबळ, प्रा.लक्ष्मणन रासकर, ऊद्योजक रमेश गायकवाड, मंगेश शिंदे अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन साबळे परिवाराच्या वतीने शरद साबळे, भरत साबळे, मंगेश साबळे, एकनाथ साबळे, योगेश साबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या सांगता महाप्रसादाने झाली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *