बालकांना पाढे उच्चार शिकण्यासाठी तुषार मेहता यांचेकडून ४ बोलकी मशीन भेट – युवा क्रांती पोलीस मित्र खेडचे संघटक अंकुश आगरकर यांच्या प्रयत्नांना यश 

204
चाकण,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – समाजसेवेची मनापासून आवड तेही निस्वार्थ असली की,आपोआप सवड मिळते. याचे उत्तम उदाहरण पाहावयास मिळाले ते म्हणजे युवाक्रांती पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेचे खेड तालुका संघटक अंकुश बाळकृष्ण आगरकर हे होत.
           अंकुशराव राजगुरूनगर जवळच्या आगरकरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील असून शेती बरोबरच एका कंपनीत ही ते काम करीत आहेत. घरी आई,भाऊ,पत्नी,भावजय,मुले एकत्रितपणे गुण्यागोविंदाने रहात आहेत.आणि हे एक आज काळ च्या नवीन पिढीत वेगळ्याच तोऱ्यात वावरणाऱ्या तरुण पिढीला आदर्शवत असे उदाहरण आहे. वडिलांचे छत्र लवकरच हरपल्याने आईने जाबाबदारी खांद्यावर घेत मुलांना योग्य ते व पारमार्थिक संस्कार देत मोठे केले.अंकुशराव यांना लहानपणापासूनच आईकडून समाजसेवेचे बाळकडू मिळालेले असताना आता ते करते व करवते झाल्याने आपण ही समाजाचे देणे लागते या भावनेतून अनेक सामाजिक,शैक्षणिक,विधायक कामे ते मार्गी लावतांना दिसत आहेत.मग सोसायटीतील प्रश्न असोत,शाळांमध्ये लागणारे विविध शैक्षणिक साहित्य असो ते सज्जन,दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून विनाअट मिळवून देण्याचे कार्य करीत असल्याने युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या संकल्पने नुसार प्रामाणिकपणे कार्य करताना दिसून येत आहेत.
        नुकतेच अंकुशराव आगरकर यांनी भोसरी येथील मेहता प्रेसींग कंपनीचे मुख्याधिकारी तुषार हुकुमचंद मेहता (पुणे,लायन्स क्लब) यांच्या माध्यमातून मिळालेले मुलांसाठी ४ स्पीच थेरपी मशीन उपल्बध करून दिली आहेत. चाकण जवळील विशेष मुलांच्या शाळेत स्वतः जात आगरकर यांनी तेथील शिक्षकांना या मशीनद्वारे मुलांना स्पीच थेरपी बाबत माहिती दिली.चाकण येथील नवयुग अंगणवाडी,चाकण आगरवाडी येथील अंगणवाडी,चाकण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगरवाडी.राजगुरुनगर येथील स्वराज्य शिक्षण संस्था.संचलीत सहयोग विशेष मुलांच्या शाळेत ही बोलणारी यंत्रे पोहोच केली.एक ते शंभर, पाढे ,शब्द ,पावकी चे पाढे (जे पूर्वी उजळणी च्या पुस्तकात होते) हे सर्व उच्चार करण्यासाठी मुलांना ऊपयोग होणार आहे.
आणि हे मशीन अगदी सर्व गाण्यासारखे मशीन बोलत असल्याने  मुलांना त्यातुन शैक्षणिक आवड ही निर्माण होणार आहे. आवड निर्माण होणार आहे.
        अंकुश आगरकर यांनी राबविलेल्या या स्तुत्य व विधायक उपक्रमाबद्दल  युवा क्रांती पोलीस मित्र,माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री ताई अहिरे, ह.भ.प.नाना महाराज कापडणीस,संचालक गणेशराव आदमने,पश्चिम महाराष्ट्र संघटक डॉ राजेश्वर हेंद्रे, नाशिक जिल्हा अध्यक्ष किशोर कोठावदे,धुळे जिल्हा अध्यक्ष प्रसाद वाणी,पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,प्रा.पत्रकार सुभाष शेटे,पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शेलार,पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विकास मोरे पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष सुरेशराव आप्पा गायकवाड,आनंदी शहर अध्यक्षा ज्योती हुंबे,शिरूर तालुका अध्यक्ष सतीश वाखारे,उपाध्यक्ष संदीप भाकरे,कार्याध्यक्ष विलासराव रोहिले,सदस्य विठ्ठलराव गावडे,सुनील रत्नपारखी,व पुणे जिल्हा व शिरूर तालुका युवक्रांती टीमने आगरकर यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *