मुरबाड,ठाणे : टोकावडे येथे उज्वला योजनेचे गँस वाटप, जंगल तोड थांबवण्याचा प्रयत्न

680
       मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील  दुर्गम भागातील टोकावडे  परिसरातील  टोकावडे, मानिवली,एकलशाआई
वाडी,नागवाडी,बोराडपाडा,तळवली बारागावमधील गरजू लाभार्थी लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उज्वला योजना अंतर्गत गॅस सिलेडंर युनिटचे वाटप करण्यात आले. हे गँस युनिट वाटप वन विभाग टोकावडे कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी टोकावडे वनविभागाचे वनक्षेञपाल नाईक,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन चिंतामण घोलप गुरुजी,पक्षाचे सरचिटणीस प्रकाश पवार ,माजी जि.प.सदस्य संजय पवार,बाळासाहेब भालेराव,वनपाल कपील पवार,टोकावडे ग्रामपंचायत ग्रामसेवक अश्विनी यशवंतराव,उपसरपंच किरण पवार व सदस्य  उपस्थीत होते.
        या योजनेच्या माध्यमातून ४० लाभार्थ्याना गॅस युनिटचे वाटप करताना या गँस वाटपा मुळे दुर्गम भागात गँस चा वापर होवुन आता जंगल तोड थांबण्यास नक्कीच मदत होणार आहे
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *