मुरबाड,ठाणे : मुरबाड -कल्याण रोडवर वडाचे झाड पडल्याने सकाळी तीन तास वाहतुक विस्कळीत, तीन तासाने वाहतुक सुरळीत करण्यात यश

461
         मुरबाड,ठाणे : मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्ग 61 वर किशोर गावाच्या पुढे वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने तीन तास वाहतुक विस्कळीत झाली होती. मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील आग्निशामक दल व मुरबाड पोलिस यांच्या प्रयत्नाने तीन तासाने वाहतुक सुरळीत करण्यात यश मिळाले.
           मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्ग 61वर पुर्वी वडाची शेकडो झाडे होती कालातंराने रस्ता रुदीकरणात अनेक झाडे काढण्यात आले तर काही झाडे  वणवा व विनाकारण बुंध्याला  आग लावुन नष्ट  केली असाच प्रकार किशोर गावाजवळ रस्त्यालगतच्या वडाच्या झाडाच्या बुंध्याला दोन दिवसा पुर्वी आग लावण्यात आल्याचे पोलिस सुत्रा कडुन माहीती मिळाली मात्र याकडे दुर्लक्ष  झाल्याचे दिसुन आले परंतु झाडाचा बुंधा संपुर्ण जळाल्याने सकाळी नऊ वाजता झाड रोडवर कोसळल्याने दोन्ही कडील वाहतुक ठप्प झाली होती  सुदैवाने झाड कोसळल्याने कुठलेही वाहन न सापडल्याने मोठी हानी टळली तर आग्निशामक दल व मुरबाड पोलिसाच्या सहाय्याने वाहतुक सुरळीत करण्यात आली.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *