अलिबाग,रायगड : दिव्यांगांना आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची वेळ,अनेक दिव्यांग शासकीय अनास्थेमुळे योजनांपासून वंचित,रायगड जिल्हाधिकाऱयांना दिले निवेदन

518
       अलिबाग,रायगड : अलिबाग तालुक्यातील दिव्यांगांना आपल्या विविध मागण्यांसाठी आज सोमवार दि. १० ला रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची वेळ आज आली. वास्तविक पाहता अनेक दिव्यांग शासकीय अनास्थेमुळे अपंगांसाठीच्या विविध योजनांपासून वंचित असून याबाबत अलिबाग तालुक्यातील दिव्यांगांनी अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बी जी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधकारी कार्यालयावर मोर्चा काढत  रायगड जिल्हाधिकारी डॉ विजय सू्यवंशी
यांना  निवेदन दिले. 
        वास्तविक पाहता बरेचशे दिव्यांग सर्वांगीण विकासाच्या शासनाच्या व संबंधित अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे शासन धोरणापासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यासाठी तसेच त्यांच्या विविध मागण्यांसाठी अलिबाग तालुक्यातील दिव्यांगांनी अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बी जी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज ह्या मोर्चाचे आयोजन केले होते.
       शासनाच्या परिपत्रकानुसार सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून अपंगांना पाच टक्के निधीचा लाभ योग्य प्रकारे दिला जात नाही .म्हणून या परिपत्रकाकडे संबंधी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी दुर्लक्ष करुन दिव्यांगांची दिशाभूल करत आहेत .त्यामुळे रायगड जिल्ह्यातील बरेचशे दिव्यांग या निधीतून वंचित आहेत.तो त्यांना नियमित मिळवा.याला कारणीभूत अधिकारी,पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना सक्त सूचना देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.
         जिल्हा रुग्णालय,शासकीय समाज कल्याण कार्यालय गोंधळपाडा ,जिल्हाधिकारी कार्यालय ही कार्यालये वरच्या मजल्यावर असल्यामुळे या ठिकाणी लिफ्टची सोय,व्हील चेअर, रॅम्प नसल्यामुळे दिव्यांगांना तिथे पोहोचणे कठीण असून या ठिकाणी त्यांना सुलभ संचार करण्यासाठी योग्य त्या सेवा व सुविधा तातडीने कार्यान्वित करण्यात याव्यात.  जिल्हा परिषदेचा अपंग विभाग कार्यालयाच्या कर्ज योजना बँकांशी निगडित आहे, मात्र या बँका त्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करून दिव्यांगांची कर्ज प्रकरणे रद्द करन्यास प्रकार ही घडत आहेत. त्यामुळे बरेचशे दिव्यांग कर्जापासून वंचित राहतात.अश्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा दिव्यांगांनी मोर्चा काढला होता. तर याबाबत योग्यतो निर्णय घेतला जाईल अशी हमी जिल्हाधिकारी यांनी यावेळी उपस्थित दिव्यांगांना दिली.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *