अलिबाग,रायगड : पजांब नँशनल बँक घोटाळेबाज हिरे व्यापरी निरव मोदीच्या अलिबाग येथील फार्महाऊस वरील कारवाई कायद्याच्या कचाट्यात ?

485
       अलिबाग,रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग व मुरुड तालुक्यातील crz चे उल्लघंन प्रकरणी जिल्हा प्रशासनेने कोर्टाला लेखी हमी दिल्यामुळे पुन्हा बँकं घोटळेबाज निरव मोदी पुन्हा एकदा  चर्चेत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
         परंतु सबंधीत कायद्याचे उल्लघंन केलेल्या निरव मोदीचा अलिबाग येथील फार्म हाऊस पाडण्याची कारवाई होणार का ?ह्या प्रष्णांचे  अद्याप कोणाकडेच उत्तर नसल्याची स्थिती आहे.
        पजांब नँशनल बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यावर ईडीने निरव मोदीच्या देशभरातील प्राँपर्टी सिल करण्यात आल्या तेव्हा अलिबाग मधील किहीम येथील बगंला ही सिल करण्यात आला होता. परंतु crz अतंर्गत कारवाई मध्ये निरव मोदीचा अलिबाग येथील बगंला ही असल्यामुळे हायकोर्टात दिलेल्या शपथपत्रानुसार रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी २० डिसेबंर च्या आगोदर crz उल्लघंन प्रकरणी कारवाई करणार का हा प्रश्न सध्या रायगड मध्ये चांगलाच चर्चिला जात आहे. कारण निरव मोदीच्या बंगल्यावर कारवाई करीता ईडी ची परवानगी घ्यावी लागणार असून आता हा तिढा जिल्हा प्रशासन कसा सोडवणार या कडे कायदेतज्ञाचे व नागरिकांसह कायदा मोडणा-या ईमले धारकांचे लक्ष लागले आहे.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *