शिक्रापूर येथील पत्रकारांना स्वखर्चाने विमा देणार – सरपंच रमेश गडदे

148

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर हाद्दीतील सर्व पञकार बांधवांना विमा कवच स्वखर्चाने देणार असल्याचे शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले. यावेळी दिवाळी निमित्त शिक्रापूर येथील सर्व पञकार बांधवाना दिवाळी निमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले. सरपंच पदाचा भार घेतल्यानंतर सलग तीन वर्ष हा कार्यक्रम राबवतात. पत्रकार बांधव हे अहोराञ समाजासाठी काम करत असतात. काम करत त्याना अंनत अडचणीशी सामना करावा लांगतो. त्याचा विचार करुन त्यांना विमा कवच द्यावा हि संकल्पना सुचली असल्याचे गडदे यांनी सांगितले. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला ३० पञकार उपस्थित होते. यावेळी ञिनयन कळमकर, कृष्णा सासवडे,  जेष्ठ पञकार नागनाथ शिंगाडे , जगताप सर, प्रा देशमुख सर , उद्यकांत ब्राम्हाणे, नंदकुमार शहाणे, सर्पमिञ शेरखान शेख. धनश्याम तोडकर, विनायक साबळे, निलेश जगताप, नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य पञकार राजाराम गायकवाड, संतोष काळे,  ग्रामपंचायत कर्मचारी विलास पवार, गणेश गायकवाड  अन्य उपस्थित होते. पञकार बांधवाच्या वतीने नागनाथ शिंगाडे, जगताप सर, उदयकांत ब्राम्हणे, संतोष काळे आदींनी मनोगते मांडली. कार्यक्रमाचे अभार ञिनयन कळमकर यांनी केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *