जिजामाता महाविद्यालयास नॅक मानांकन प्राप्त

474
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : जातेगाव बु . (ता. शिरूर): येथील जिजामाता वरिष्ठ महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) त्रिसदस्यीय समिती 26 व 27 डिसेंबर यादिवशी भेट दिली. उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाची पडताळणी तसेच गुणात्मक दृष्ट्या दर्जा देण्यासाठी भारत सरकारच्या अधिनस्थ व विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली संचालित बंगळुरू येथील नॅक कार्यालयाद्वारा नियुक्त नॅक पिअर टिम समिती गुणात्मकदृष्ट्या पडताळणी करून महाविद्यालयाला मानांकन देत असते. महाविद्यालयाने पाच वर्षात करिक्युलर आस्पेक्ट, बेस्ट प्रक्टिसेस अशा विविध निकषांनुसार जे कार्य केले गेले त्याची गुणात्मकदृष्ट्या पडताळणी करून कागदपत्रांची तपासणी केली. याप्रसंगी पालक तसेच माजी व आजी विद्यार्थी यांच्यासोबत सुद्धा अध्ययन व अध्यापन या संबंधी सुसंवाद साधला. तसेच महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाजाची पडताळणीही केली. संस्था चालकांशी संवाद साधून महाविद्यालयीन गुणात्मक बाबींशी चर्चा केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललित कुमार इंगवले , आयक्यूएसी समन्वयक प्रा. पूजा काटे यांच्या हस्ते समिती सदस्यांचे स्वागत करण्यात आले . संस्था अध्यक्ष सुगंध उमाप, उपाध्यक्ष कांतीलाल उमाप, सचिव प्रकाश पवार, संचालक दत्ताअण्णा उमाप यांनी संकेताप्रमाणे समिती सदस्यांशी संवाद साधला. संस्था ध्येय, उद्देश व वाटचालीबाबत माहिती दिली.  यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे रामदास थिटे व सर्व प्राध्यापक वृंद ,प्रशासकीय अधिकारी प्रभाकर जाधव, कार्यालयीन अधिक्षक आनंदा अंकुश,प्रा. प्रीती पवार, डॉ. विजय गायकवाड  ,प्रा.सीमा बांगर , प्रा. अशोक शिंदे, प्रा. प्रथमेश कुलाळ, प्रा. अजय खुरपे, प्रा. सारिका जेधे, प्रा. सोनाली आव्हाळे, प्रा. श्वेता कापरे, ग्रंथपाल योगिता इंगळे,चैत्राली उमाप, लिपीक सुशेन राठोड, आकाश शितोळे, विजय शिंदे, सुरेश शितोळे  आदी या सर्वांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय मूल्यांकन कामकाजासाठी प्राचार्य डॉ तापकीर सर, डॉ.पी. एस.तांबडे सर ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय कर्मचारी यांचे विशेष परिसर सुशोभिकरण कामकाजासाठी विशेष परिश्रम घेतले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *