दैनिक संध्याच्या संपादिका ज्योती नाळे यांना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार प्रदान – पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सावंत प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार सोहळा संपन्न 

163

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जेजुरी येथील कै दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने आज शुक्रवार दि १२ ला राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक संध्या वृत्तपत्र समूहाच्या व संध्या लाईव्हच्या संपादिका ज्योती नाळे,वंदे मातरम् संघटनेचे अनिकेत हरपळे,जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ प्रमोद वाघ,सामाजिक कार्यकर्ते मोहनलाल निगडे यांना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार तसेच सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उघडा मारुती मित्र मंडळाला राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आज दि. १२ ला जेजुरी येथील कडेपठार रिसॉर्ट येथे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पुरस्कार्थीना पुरस्कार वितरण करण्यात आले. .या कार्यक्रमासाठी राज्याचे आरोग्य विभागाचे सेवा निवृत्त संचालक पद्माकर खेडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
कै सावंत प्रतिष्ठानच्या वतीने सलग २६ व्या वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या प्रतिष्ठानच्या वतीने विविध शाळांतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या बाधून देणे,गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप, वृद्धाश्रमाला आर्थिक मदत असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर,पदाधिकारी संजय सावंत,डॉ सुमित काकडे,रवींद्र जोशी,नितीन राऊत ,प्रल्हाद गिरमे यांनी माहिती दिली.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *