निमगाव भोगी येथील धर्मराज रासकर यांना राज्यस्तरीय कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान

320
 शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – निमगाव भोगी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील प्रगतशील शेतकरी धर्मराज पर्वती रासकर यांना अहमदनगर येथे दि. ११ जानेवारीस झालेल्या कार्यक्रमात रासकर यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय सावित्री ज्योती कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार अहमदनगरचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
          आपल्या शेतामध्ये नियोजन बद्ध शेती करताना विविध पिकांचे भरघोस उत्पादन घेण्याचा विक्रम धर्मराज पर्वती रासकर यांनी अनेक वेळा केलेला आहे. शेतीमातीशी निगडित असलेला हा शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळ्या पिकांमध्ये विविध प्रयोग करून स्वतः कष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी या जोरावर शेतामध्ये अतिशय टुमदार बंगला, गाडी व इतर सर्व सोयी सुविधा त्यांनी शेतीच्या जीवावर प्राप्त केलेल्या आहेत .तसेच त्यांच्या पत्नी सौ मैनावती धर्मराज रासकर या निमगाव भोगी च्या माजी ग्रामपंचायत सदस्य असून गावातील गोरगरीब जनतेचे प्रश्न त्यांच्या काळामध्ये सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे.गणपती उत्सव व विविध कार्यक्रमात ते सदैव झोकून काम करतात.या दोन्ही उभयतांच्या कष्टाची दखल घेऊन अहमदनगर येथील महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर व जय युवा अकॅडमी यांच्या वतीने राज्यस्तरीय सावित्री ज्योती कृषीनिष्ठ गौरव पुरस्कार २०२४ ने रासकर उभयतांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी विशेष सरकारी वकील अॅडवोकेट लगड, सुहासराव सोनवणे, आमदाबादचे माजी सरपंच प्रकाश थोरात, राष्ट्रीय किसान क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक नितीन थोरात, निमगाव भोगी सोसायटीचे माजी अध्यक्ष राजाराम फलके, निमगाव भोगी सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब जाधव,आदर्श शिक्षक दत्तात्रय जगताप,ग्रामपंचात सदस्य राजेंद्र शिंदे,आरोग्य खात्याचे संतोष शेळके,सामाजिक कार्यकर्ते विजय न-हे,रविंद्र पवार,सामाजिक कार्यकर्ते सुदाम रासकर,आमदाबाद गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य मंदाबाई माशेरे व इतर अनेक मान्यवर ग्रामस्थ,पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडवोकेट महेश शिंदे यांनी केले. धर्मराज रासकर यांच्या शेतीवरील निष्ठेची व त्यातून इतरांना आदर्श मिळेल असे भरगोस घेत शेतीत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे करीत असल्याने त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील,रासकर यांचा शेतकरी मित्र परिवार,निमगाव भोगी ग्रामस्थ व परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *