शिरूरच्या सिताबाई थिटे फार्मसी महाविद्यालयाचा  राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने गौरव 

210
शिरूर,पुणे : (प्रा.देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर जि.पुणे येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली.), शिरूर या महाविद्यालयाचा स्पर्श सेवाभावी संस्था अहमदनगर यांच्यावतीने नुकताच राज्यस्तरीय आदर्श शाळा २०२४ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
महाविद्यालयाने ग्रामीण भागात केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून देण्यात आला. १९९५ सालापासून सिताबाई थिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसी कार्यक्षम फार्मासिस्ट घडविण्याचे कार्य करत असून जवळपास १७०० विद्यार्थी किरकोळ/घाऊक औषध विक्रेते, शासकीय फार्मसीस, औद्योगिक क्षेत्र तसेच परदेशात देखील फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयाची २०,००० स्क्वेअर फुट स्वतंत्र इमारत असून यामध्ये वर्गखोली,प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, सेमिनार हॉल इ. सुविधा उपलब्ध असून अनुभवी व तज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. महाविद्यालयाचा निकाल नेहमीच ९०% पेक्षा जास्त आहे. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण, वेळेचे नियोजन, सर्जनशीलता इ. गुण विकसित  होण्यासाठी महाविद्यालय  नेहमीच प्रयत्नशील असते.२००४ मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु जंगम संपदा हिने एम. एस. बी. टी. ई. मुंबई मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच ऑर्किड प्रि-स्कूल क्रीडांगण, नागरदेवळे, भिंगार ता. जि.-अहमदनगर येथे पार पडला.
  हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका ममताताई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कार स्विकारण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. द्वारकादास बाहेती, प्राध्यापक विशाल कारखिले, प्राध्यापक हेमांगी झिंजुर्के,प्राध्यापक शुभांगिनी केदारी आदी उपस्थित होते. महाविद्यालयास हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र थिटे,सचिव धनंजय थिटे,संचालक डॉ. हर्षवर्धन थिटे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
डॉ.अमोल शहा –  प्राचार्य, सिताबाई थिटे फार्मसी महाविद्यालय,शिरूर 
“सदर पुरस्कारामुळे महाविद्यालयाची प्रतिमा उंचावली असून आणखी नव्या जोमाने कार्य करण्याची ऊर्जा सर्व शिक्षकांना मिळाली आहे. तसेच सुप्रिया साबळे, मंडलिक मॅडम (माजी विद्यार्थिनी डी.फार्मसी.) आणि सर्व विद्यार्थी, हितचिंतक यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच महाविद्यालयास आज हा पुरस्कार प्राप्त झाला.सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.” 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *