यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

203
शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या प्रहार संस्था वतीने दिव्यंग अणि एकल महिलांसाठी शिरुर येथील डॉ.आंबेडकर उद्यान या ठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा मध्ये सुमारे 100 महिलांनी सहभाग घेतला. यावेळी शोभनाताई पाचंगे, राणीताई चोरे,शकुंतला दिदी, सुरेखा बोस यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या सदस्य स्नेहल बिगर यांनी दिव्यांग, मतिमंद मुलींना व्हीलचेअर तसेच सायकल चेअर खुर्ची भेट दिली. तर यावेळी दिव्यंग अणि एकल महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संस्थेच्या सचिव नम्रता गवारे यांनी बोलताना सांगितले. सर्व सामाजिक संस्था सुधा पुढे येऊन सामाजीक बांधीलकी जपून या एकल महिलांची आर्थिक बाजू चांगली होण्यासाठी मदत करावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी मनीषा वाळुंज, मनीष सोनवणे, रेणुकाताई, ज्योतीताई, यांचे सहकार्य लाभले. तर आभार यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनचे सचिव नम्रता गवारे यांनी मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *