रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

241
            शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर ग्रामीणच्या रामलिंग नगर जिल्हा परिषद शाळा दसगुडे मळा येथे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित  अतिशय सुरेख अशी भाषणे केली.यावेळी सर्वांनी “शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा देत आसमंत दणाणून सोडले. यामुळे आनंदाचे व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते,चिमुकल्या नववारी साडी मध्ये गोड दिसत होत्या.भाषणे झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे नंबर काढून,त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
            शाळेचे मुख्याध्यापक  गट सर,ग्रा. सदस्या नंदा दसगुडे, कौशल्या दसगुडे,कविता दसगुडे,ज्योती पारधी,कविता चव्हाण,सीमा चव्हाण,बायासाबाई दसगुडे, ग्रिषमा सुपलकर,शिक्षिका केशर लगड आदि महिला व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रामलिंग महिला उन्नती बहू सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी विद्यार्थांनी केलेल्या भाषणाचे कौतुक केले,यातूनच देशाचा सुजाण नागरिक घडत असतो,लहानपणीच शिवरायांचे विचार तुमच्या मध्ये रुजले तर नक्कीच तुमचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास व्यक्त करीत सर्व मुलांचे अभिनंदन केले व सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा देत उपस्थित सर्वांचे आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *