सर्व्हर डाऊनमुळे आनंदाचा शिधा मिळण्यास होतो य विलंब – शिरूर तालुक्यात शिधापत्रिकाधारकांना नाहक मनस्ताप 

243
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – मागील ३ ते ४ दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानात असलेल्या पॉस मशीनवर शिधापत्रिका धारकांचा अंगठा अर्थात आधार व्हेरिफाय करण्यासाठी असणारा सर्व्हर च सतत डाऊन होत असल्याने आनंदाचा शिधा घेण्यासाठी येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना नाहक ताटकळत उभे रहावे लागत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील स्वस्त धान्य दुकानदार गणेश रत्नपारखी यांच्या दुकानास भेट दिली असता तेथे शिधा घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून याबाबत दुकानदार रत्नपारखी यांना विचारले असता मागील ३ ते ४ दिवसांपासून सातत्याने सर्व्हडाऊन मुले सिद्धीस वितरीत करण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. तरीही प्रयत्न करून सर्व्हर लाईन मिळताच थंब घेऊन शिधा वाटप आज रविवार असून ही त्यांनी सुरु ठेवले आहे.
            याबाबत पुणे जिल्हा पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुरेश मुंडे यांना विचारले असता पूर्ण राज्यात सध्या हा प्रॉब्लेम येत आहे. सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांचे एकाच वेळीशिधावाटपाचे काम सुरु असल्याने सर्व्हर जाम होत आहे. याबाबत वरिष्ठांना कल्पना देण्यात आली असून शिधापत्रिका धारकांना नाहक त्रास होऊ नये व तात्काळ शिधा मिळावा म्हणून सर्व्हर तातडीने पूर्ण क्षमतेने व्हावा याची कल्पना देण्यात आली असून यात आगामी दोनच दिवसांत नक्कीच सुधारणा होईल असा विश्वास मुंडे यांनी सा.समाजशील शी  बोलताना दिला. 
   लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असलेल्या एकट्या रत्नपारखी यांच्या दुकानात १२८९ शिधापत्रिका धारकांची संख्या आहे. सर्वर डाऊन मुळे  नागरिकांना नाहक मनस्तापास सामोरे जावे लागत असून ताटकळत,थांबावे लागत आहे. सर्वरचा बिघाड तात्काळ दुरुस्त व्हावा अशी मागणी शिधापत्रिकाधारकांतून व्यक्त होत आहे. तर शिरूरचे पुरवठा निरीक्षक सतीश पंचरास यांना ही सर्वर डाऊन मुळे दुकानदारांना आनंदाचा शिधा वाटताना येत असलेल्या अडचणी बाबत कल्पना देण्यात आली असून वरिष्ठ पातळीवर सर्व्हर डाऊन बाबत कल्पना दिली असून लवकरच त्यात सुधारणा होईल असे सा.समाजशील शी बोलताना सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *