शिरूर,पुणे (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे आज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येथील ग्रामपंचायत आज सकाळी झालेल्या जयंती कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर अश्विनी नरेंद्र धर्माधिकारी यांनी महाराजांची आरती म्हणून शिवगर्जना,प्रेरणा मंत्र म्हटले. उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज कि जय,जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा देत,शिवरायांचा जयजयकार करीत सभागृह दणाणून सोडले.
कार्यक्रमास स्वामीभक्त माधुरी जाधव,मीना रोकडे,रंजना कुंभार, माजी सरपंच बी एम पोकळे,उपसरपंच उत्तमराव जाधव,बाळासाहेब डांगे,नवनाथ सांडभोर,प्रवीण बाफणा,पांडुरंग सांडभोर,किसन हिलाळ,बाळशिराम मुंजाळ,हौशीराम मुखेकर,आबा वागदरे,राजेंद्र इचके,गणेश रत्नपारखी,निलेश पोकळे,रामदास इचके,अविनाश पोकळे,बबन जाधव,गुलाब वागदरे,भरत रोडे,बबन नाना शिंदे,अमोल पंचरास,सनी रेणके,पोपटराव शिंदे,तानाजी पोपळघट,सांडभोर,इचके,ग्रामपंचा यत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.