दसगुडे मळ्यात शेतकरी महिलांसोबत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न – रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेचा उपक्रम 

302
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – आठ मार्च हा दिवस सर्व ठिकाणी जागतिक महिला दीन म्हणून साजरा केला जातो.याचे औचित्य साधत रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेने दसगुडे मळा येथे शेतकरी महिलांसोबत हा दिवस उत्साहात साजरा साजरा केला.मान्यवर शेतकरी महिलांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था नेहमीच महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करत असते. या महिलादिन कार्यक्रमात महिलांचे उखाणे,त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी केल्या.शेतातून स्वतः काही करण्यासाठी वेळ मिळत नाही. शेती आणि घर एवढे च आमचे विश्व आहे त्यामुळे बाहेरचे जग आम्हाला माहीत नाही. पण आज तुम्ही येऊन आमच्या सोबत गप्पा गोष्टी,आमच्या अडचणी समजून घेतल्या असे उपस्थित महिलांनी भावपूर्ण उदगार काढले. कोणावर हि संकट आले तर आम्ही सर्व एकीने त्यांना मदत करत असतो.त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण यावेळी पहायला मिळाले.
    समाजामध्ये तळागाळात काम करणाऱ्या आशा वर्कर म्हणून ओळखल्या जातात.यांचे कार्य खूप कौतुकस्पद आहे.कमी मानधन असतानाही समाजाचे ते काम करत असतात.यांचा सन्मान होणे आवश्यक आहे.म्हणून महिला दिनानिमित्त आशा वर्कर यांना साडी चोळी देऊन रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
अश्विनी (राणी) कर्डिले – संस्थापक अध्यक्षा रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था 
 “जिथे गरज आहे तिथे या प्रमाणिक पणे काम करत असतात,यांच्या या कार्याला माझा नेहमीच सलाम आहे,तुमच्या या कामाची पावती म्हणूनच महिला दिनानिमित्त  आशा वर्कर यांचा सन्मान केला.कधीही कुठेही अडचण आली तरी मी नेहमी सोबत आहे.तुमचे काम महान आहे,यात कधीही कमी पणा समजू नका.चांगल्या कामाची पावती नेहमी चांगली मिळते.” 
          यावेळी मान्यवर म्हणून शेतकरी महिला होत्या.यामध्ये आजीबाई यांना प्रमुख पाहुणे म्हणून मान देण्यात आला.हिराबाई दसगुडे, मंदाबाई दसगुडे, चंदाबाई दसगुडे,ताराबाई दसगुडे या महिला होत्या .तसेच आशा वर्कर कौशल्या दसगुडे,मिरा दसगुडे,महाजन ताई तसेच ग्रा. सदस्या – नंदा दसगुडे, अंगणवाडी शिक्षिका – उर्मिला दसगुडे, कविता दसगुडे, बायसाबाई दसगुडे ,मयुरी दसगुडे अनेक महिला मान्यवर उपस्थित होत्या.सर्वांचे आभार संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *