शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – लोकसभेच्या निवडणूका जवळ आल्या असल्याने सर्वत्रच राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिरूर तालुक्यातील माडवगण फराटा व आंबेगाव तालुक्यातील येथील शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केले.यावेळी त्यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि आमदार अँड.अशोक पवार यांना लक्ष केले.सेलिब्रेटीला लोकसभेची उमेदवारी दिली ही आमची चुक झाली.निवडणूकीच्या आखाड्यात एखादा उमेदवार पडत नसेल तर सगळेच राजकीय पक्ष त्याला पाडण्यासाठी एखादा सेलिब्रिटी निवडणुकीच्या मैदानात उतरवतात.आणि समोरच्या उमेदवाराचा पराभव करतात. ही वस्तूस्थिती आहे.त्यात आमच्याही चुका आहेत.डॉ.अमोल कोल्हे यांना मागील वेळी लोकसभेची उमेदवारी देऊन चुक केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.सुरवातीला मिच डॉ.अमोल कोल्हे यांना मतदान करा म्हणून तुमच्याकडे विनंती करायला यायचो.त्यांना मी दुसऱ्या पक्षातून घरी नेऊन पक्षात घेऊन तिकीट देऊन निवडून आणल.मला वाटले वकृत्व चांगले आहे दिसायला राजबिंडा आहे. चांगले काम करेल परंतू तसे न होता दोनच वर्षात गडी राजीनामा देण्यासाठी निघाला.मी थांबवले, म्हणाला मला खासदार पदावर थांबणे शक्य नाही माझ्या अभिनयाच्या व्यावसायावर परिणाम होत आहे.मला मतदार संघात वेळ देता येत नाही.
तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली
तुमच्या आमदाराने खासगी कारखाना व्यवस्थित चालवला,पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. तुम्ही म्हणाल आता काय बोलायच आधी मत तुम्हीच द्यायला लावली मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल.कारखाना चालवायला जमत नसेल तर नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू,परंतू शेतकऱ्यांची पिळवणूक न होऊ देता घोडगंगा कारखाना संकटातून बाहेर काढू.अशा शब्दांत शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवारांनी अशोक पवार यांची खिल्ली उडविली. .ते शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.याच पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंचर सभेत ही विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
डॉ.अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया
संसदेमध्ये असलेल्या सेलिब्रेटीं पैकी किती जणांना संसदरत्न पुरस्कार मिळाले ? मी राजीनामा देणार होतो तर मग पहिल्या टर्म मध्ये व पुढे मला तीन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला.तसेच मी संसदेमध्ये उपस्थिती थांबवली का ? मी शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्याचे थांबवले का ? मी तर नेहमीच आवाज उठवत राहिलो.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे , रमेश थोरात, प्रदिप गारटकर , रविंद्र काळे , दिलीप वाल्हेकर, वीरधवल जगदाळे , सुरेश घुले , उमेश पाटील , राजेंद्र नागवडे , सदाशिव पवार, राजेंद्र जगदाळे , शशिकांत दसगुडे , दादा पाटील फराटे , सुधिर फराटे , वैशाली नागवडे, केशर पवार , कुसूम मांढरे , मोनिका हरगुडे , श्रुतिका झांबरे तर मंचर येथील शेतकरी मेळाव्यास शिरूर आंबेगाव मधील अजित पवार,वळसे पाटील यांचे हजारो कट्टर समर्थक व मान्यवर उपस्थित होते.