अलिबाग,रायगड : खवल्या मांजर विक्री करणारी टोळी गजाआड ,रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई, सुमारे ८० लाख रुपये किमतीची खवली मांजरे सापडली

2473
          अलिबाग,रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन परिसरामध्ये खवल्या मांजर विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला लागली त्यानुसार शनिवार दिनांक 15 डिसेंबर रोजी  श्रीवर्धन तालूक्यातील वाळवटी- खेडी येथील श्रीवर्धन शेखडी रस्त्यालगत असणाऱ्या दानियल फार्म येथे या खवल्या मांजरांना विकण्यासाठी आणले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे सापळा रचला गेला.या सापळ्यात अंदाचे 80 लाख रुपये किंमतीचे दोन खवल्या मांजरांसह त्यांना विक्रीसाठी आणणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील फैजल अब्दुल अजीज काळोख, निलेश अनंत कर्णेकर, अशोक गणपत दर्गे, आणि किशोर महादेव मोहिते या पाच जणांना  रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्यांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले असून वन्यजीव सरक्षंण अतंर्गत श्रीवर्धन वनविभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *