शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई परिसरा ला आज गुरुवारी सायंकाळी पाच नंतर सुमारे तासभर पडलेल्या तुफानी पावसाने हाहाकार उडवला.आज कवठे गावाचा आठवडे बाजार असल्याने व्यापारी,भाजी,फळ विक्रेते यांची मोठीच तारांबळ झाली.गाव शिवार व परिसरात या वर्षीच्या पडलेल्या पहिल्या च जोरदार पावसाने तासभर दणका दिला. येथील गावठाण,ढाकी वस्ती,येडे बोराडे वस्ती त वारे व पावसाचा अधिक जोर असल्याचे योगेश सांडभोर यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
आज सायंकाळी कवठे परिसरात जोरदार वारे,विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याचे डॉ. प्रवीण भालेराव यांनी सांगितले.या हंगामात प्रथमच जोरदार बरसलेल्या या पावसाने परिसरातील शेती अनेक ठिकाणी जलमय झाली होती. टाकली हाजी रोड लगत येडे बोर्हाडे वस्ती जवळ अनेक शेतात पाणी साचले होते नव्यानेच लावलेल्या पपईच्या बागेत मोठे पाणी साचलेले दिसत होते. ढाकी की वस्ती नजीक ऊस पिकाला ही या जोरदार पावसाचा तडाखा बसल्याचे योगेश यांनी सांगितले.अचानक आलेल्या पावसाने भरपावसात तयार कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाल्याचे शेतकरी बबन राजेंद्र गावडे यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.