ब्रिटानिया कंपनीकडून अक्षदा साठी पन्नास हजार रुपयांची मदत – मिडगुले कुटुंबाला दिलासा 

832
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे, संपादक) – मुलाचे शिरूर तालुक्यातील सतत दुष्काळी भाग म्हणून गणला जाणाऱ्या मिडगुलवाडी तालुका शिरूर येथील दीपक मिडगुले कुटुंब पण कामधंद्यानिमित्ताने आंबेगाव तालुक्यातील खडकवाडीत वास्तव्यास असणारे दीपक मिडगुले कुंटुंबाची अक्षदा ही चिमुकली सुंदर लाडकी लेक. पण वर्षभरापूर्वी अतिशय त्रासदायक आजाराने तिला ग्रासले. दीपक मिडगुले यांची परिस्थिती जेमतेमच.उपचारासाठी येणारा खर्च ही अमाप. अक्षदांच्या उपचारासाठी वर्षभरापूर्वी कान्हूर मेसाई येथील सामाजिक कार्यकर्ते शहाजी राजे दळवी व सामाजिक मदतीचा वसा हाती घेत मागील पंधरा ते वीस वर्षांपासून पत्रकारितेतून हजारो गोरगरीबांना विनाशर्त मदतीचा हात मिळवून देणारे कवठे येमाई येथील जेष्ठ पत्रकार तथा समाजशील न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक प्रा.सुभाष अण्णा शेटे यांनी विविध स्टार व माध्यमातून मदतीचे आव्हान राबविले होते. मानवता व दातृत्व भावनेतून अनेकांनी अक्षदांच्या उपचारासाठी मदत केली होती. अक्षदाला मदत व्हावी म्हणून ब्रिटानिया कंपनीचे रवी पवार हे कान्हूर मेसाई येथे आले असता समाजसेवक शहाजीराजे बाळासाहेब दळवी यांनी अक्षदाच्या उपचाराची कागदपत्रे  त्यांच्याकडे देण्यात आली होती. खैरवाडी येथे ब्रिटानिया कंपनीच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित केलेले असताना सरनेस वाडिया फाउंडेशनच्या महाव्यवस्थापक कुशाला शेट्टी मॅडम यांची भेट घेतली होती.  हि  मदत मिळून देण्यासाठी सरनेस वाडिया फाउंडेशनच्या महाव्यवस्थापक कुशाला शेट्टी मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.आज रोजी ब्रिटानिया कंपनीने 50000/- पन्नास हजार रुपये मदत केली. ही मदत दीपक मिडगुले यांच्या बँक खात्यात जमा झाली.
 या कामी कंपनीचे रवी पवार, ब्रिटानिया दुध डेअरीचे बाळासाहेब रामा सुक्रे, खैरनगरचे दगडू खैरे यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले. ब्रिटानिया कंपनीने केलेल्या मदतीबद्दल  कंपनी पदाधिकारी यांचे   मुलीचे वडील दिपक मिडगुले व आत्या ज्योती धुमाळ यांनी आभार मानले. या मदतीमुळे परिसरात व विविध स्तरातून कौतुक होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *