Search

राऊतवाडी येथील काळुबाई मंदिर परिसरात महिलांच्या हस्ते वृक्षारोपण

262

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : जॉन डियर इंडिया व वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट व ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्रापूर येथील राऊतवाडी या ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त महिलांच्या हस्ते काळुबाई मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये वड पिंपळ, चिंच, करंज, आवळा, कडुलिंब या देशी झाडांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी शिक्रापूर गावचे प्रथम नागरिक सरपंच रमेश गडदे, ग्रामसेवक शिवाजी शिंदे, वॉटर ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधी शरद बनगडे, विभागीय प्रबंधक संतोष चौधरी, उपविभागीय प्रबंधक अंजना बांदल, मनोज जाधव, आकाश सावंत, समीक्षा पिंपळकर , रोहित काळे, सुरज शेगर, धनश्री राणे त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य उषा तानाजी राऊत, मोहिनी युवराज मांढरे, शालनताई अनिल राऊत, त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, प्रकाश वाबळे, सामाजिक कार्यकर्ते सतीश बावधाने, लहू बावधाने त्याचबरोबर निसर्ग ग्रामसंघाच्या सर्व महिला प्रतिनिधी त्याचबरोबर परिसरातील सर्व महिला उपस्थित होत्या.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *