भीमाशंकरच्या सुधारित ऊस बेने लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल – बेणे अर्ज भरण्यासाठी कवठे कार्यालयात  शेतकऱ्यांची मोठी गर्दी

772
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे यमाई परिसरातून गेलेल्या डिंबा उजवा कालवा व घोड नदी मुळे कवठे येमाई परिसरातील बहुसंख्य शेत जमीन गेल्या दहा पंधरा वर्षात बागायती झाल्याचे पहावयास मिळते.  एक हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून आता शेतकरी ऊस पिकद्वारे प्राधान्याने उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.  त्यातच जवळच असलेला व राज्याचे सहकार मंत्री तथा या भागाचे लोकाभिमुख कार्य करणारे  आमदार दिलीपराव वळसे पाटील संस्थापक अध्यक्ष असलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व रावडेवाडी येथील पराग कारखाना तोडणीवेळेस ऊस देण्यासाठी खात्रीशीर व वेळेत उसाचे पेमेंट देणारा कारखाना म्हणून ज्ञात आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांची नव्याने ऊस लागवड करण्याची धांदल,गडबड सुरू असून भीमाशंकर सहकारी कारखान्याचे सुधारित २६५ जातीचे ऊस बेणे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कारखान्याच्या कवठे यमाई विभागीय कार्यालयात आत्तापर्यंत सुमारे ३२५ शेतकऱ्यांनी ऊस बेणे मिळण्यासाठी नोंदणी केली असून गटात सुमारे २५० हेक्टर क्षेत्रात आज पर्यंत ऊस लागवड झाल्याचे व अद्यापही शेतकऱ्यांकडून ऊस बेण्यासाठी मोठी मागणी येत असल्याची माहिती कार्यालयातील लेखनिक बाळासाहेब विरकर यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली. शेतकऱ्यांना पूर्ण समाधान मिळेल असे कवठे येथील भीमाशंकर कारखान्याच्या विभागीय गट कार्यालयाचे  कामकाज असून या कामकाजाबाबत परिसरातील शेतकरी, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील, युवा क्रांती पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुख तथा मार्गदर्शक प्राध्यापक पत्रकार सुभाष शेटे,युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष विलासराव रोहिले,पत्रकार मारुती पळसकर,धनंजय साळवे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
          कवठे विभागीय कार्यालयात कारखान्याच्या वतीने रोहिदास विधाटे हे गटप्रमुख म्हणून उत्कृष्ट कार्य करत असून त्यांच्या सोबतीला संतोष नऱ्हे, नितीन पंचमुख,महेश धुमाळ, दीपक जगताप, बाळासाहेब विरकर, संतोष ढोबळे, भरत ढोबळे इत्यादी कर्मचारी शेतकरीभिमुख कार्य करताना दिसून येत आहेत.  तर मागील तीन वर्षांपासून छगन हरिभाऊ चव्हाण हे आपल्याकडील चार ट्रॅक्टर व २४ मजुरांचे सहाय्याने भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कवठे गटात लावण्यात आलेले ऊस बेणे लागवड असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातून तोडून बेणे मागणी असलेल्या शेतकऱ्याच्या थेट शेतात व वेळेत पोचवण्याचे काम प्रामाणिकपणे करताना उत्कृष्ट सेवा देताना दिसून येत आहेत. तर सुधारित ऊस बेणे लवकर मिळावे म्हणून नोंदणी करता कवठे गट कार्यालयात मोठी गर्दी होतीना दिसून येत आहे आज शनिवार दि.२२ ला प्रगतशील शेतकरी लक्ष्मण नाना मुखेकर,पांडुरंग भोर, एकनाथ रामभाऊ गावडे, पांडुरंग हिलाळ, बाळासाहेब इचके, सागर मुखेकर व अनेक शेतकरी नोंदणीसाठी उपस्थित होते.
– डी. जे.  कुरकुटे  – शेतकी अधिकारी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना
 “कवठे यमाई गाव शेतीचे मोठे क्षेत्र असलेले गाव असून शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस लागवड करण्याकामी कारखान्याच्या वतीने उपलब्ध होत असलेले सुधारित ऊस बेणे घेऊन नियोजनबद्ध लागवड करावी. तसेच कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ऊस शेती विषयी उपयोगी विविध योजनांचा अधिकाधिक फायदा घ्यावा. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *