Search

शिक्रापूर बस स्थानक परिसरात वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

184

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर बस स्थानक परिसरामध्ये शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुप तर्फे वटपौर्णिमाचे औचित्य साधून वृक्ष लावगड करण्याचे आव्हान करण्यात आले होते. ग्रुपमधील महिला स्वयंसेविका यांनी हे आव्हान केले होते. वटपौर्णिमेच्या या सणाचे औचित्य साधून ग्रुपच्या अनेक महिला स्वयंसेविका व काही स्वयंसेवक एकत्रित येऊन शिक्रापूर बस स्थानक परिसरात वडाचे झाड लावून वटपौर्णिमा हा सण साजरा केला .यावेळी ग्रुपच्या महिला स्वयंसेविका उपसरपंच मोहिनीताई मांढरे, भूमाता ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष मंगलताई सासवडे, उमाताई घारे, भिमाताई धुमाळ, सुरेखाताई राऊत, श्रद्धाताई काळोखे, संगीताताई अहीरे ताई,नंदा ताई भुजबळ आणि इतर स्वयंसेवक उपस्थित होते. तसेच ग्रुपच्या आणि शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने शिक्रापूर परिसरात अनेक वेग वेगळ्या ठिकाणी देशी प्रकारची झाडे जसे वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब अशी लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात यावेळी देण्यात आली.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *