Search

मनोरथ सोसायटीत नूतन मंदिराचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

248

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : मनोरथ कॉ-ऑफ सोसायटी बजरंगवाडी शिक्रापूर, या ठिकाणी नूतन गणपती बाप्पाचे भव्य मंदिर स्थापन करुन श्री ची मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहनाचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. शिक्रापूर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व एकीचे बळ या साठी परिचित असलेल्या मनोरथ सोसायटी मध्ये सर्व सभासदांच्या सहकार्याने भव्य श्री गणेशाच्या मंदिराची वास्तू उभी केली व शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीची व कलशाची मिरवणूक काढून महापूजा करण्यात आली. यावेळी या मंदिरातील पहिल्या आरतीचा मान SAP PARTS PVT LTD कंपनीचे CMD व प्रसिध्द उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांना देण्यात आला. हा देखणा सोहळा संपुर्ण दिवसभर चालू होता. सायंकाळी महाप्रसाद व रात्री श्री विठ्ठल रुक्मिणी महीला भजणी मंडळ बजरंगवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम कऱण्यात आला. सदर सोहळ्यास प्रसिध्द उद्योजक प्रसाद कुलकर्णी सहकुटुंब उपस्थित होते, त्याचं प्रमाणे शिक्रापूर चे आदर्श सरपंच रामभाऊ सासवडे, शिक्रापूर ग्रामपंचायत सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे, माजी ग्रामपंचायत उपसरपंच नवनाथ बापूसाहेब, जगताप  सासवडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन सासवडे, जीवन ज्योत संस्था चे अध्यक्ष ज्योतीताई पाटिल, रियांश मल्टीट्रेड कंपनी चे विशेष प्रतिनिधी दत्ताजी मांडे, विष्णू अवचर व इतर मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा मनोरथ कॉ ऑफ सोसायटी चे चेअरमन जालिंदर निर्मळ, सेक्रेटरी सचिन खोदडे, व खजिनदार मोहन आवतडे यांच्या तर्फे सन्मान करण्यात आला.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *