Search

शिक्रापूर जि.प. शाळेचा राज्यात डंका ; शाळेचे घवघवीत यश

96

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर येथील सन 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाळेने उत्तुंग यश प्राप्त केले. शाळेतील उत्कर्षा विनोद दानवे ही विद्यार्थिनी 290 गुण घेऊन राज्यात प्रथम आली असून, राज्य गुणवत्ता यादीत 12 विद्यार्थी व जिल्हा गुणवत्ता यादी 44 विद्यार्थी असे एकूण 56 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. त्याचप्रमाणे जवाहर नवोदय विद्यालयासाठी शाळेतील चार विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक म्हणून सौ अरूचना गणेश मांढरे,  सुरेखा सोपान  गिरवले, वर्षा रुपेश जकाते, सौ मनीषा प्रकाश मोरे,श्री पांडुरंग एकनाथ नाणेकर, श्री संजय नारायण थिटे, श्री बबन किसन पुंडे यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक करण्यासाठी शिक्षण परिषदेचे सहाय्यक संचालक सौ ज्योती परिहारमॅडम, शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी  श्री अनिल बाबर साहेब, विस्ताराधिकारी सौ वंदना शिंदे तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख श्री प्रकाश लंघे उपस्थित होते. तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई मांढरे, शिक्रापूर नगरीचे सरपंच श्री रमेश गडदे, उपसरपंच सौ सारिका ताई सासवडे, सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच तथा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ श्री नवनाथ भाऊ सासवडे, समाजशील न्यूज चे पत्रकार राजाराम गायकवाड, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सनी जाधव, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत मांढरे, सदस्य सौ वंदना वर्मा, कमलताई जगदाळे , आधार फाऊंडेशन उपाध्यक्ष पल्लवीताई हिरवे, ग्रामस्थ, पालक,शिक्षक उपस्थित होते. शाळेने मिळवलेले उत्तुंग यश हे शिक्षकांच्या कष्टाचे प्रतीक आहे असे गौरवोद्गार आलेल्या सर्व मान्यवरांनी काढले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री टाकळकर सर यांनी केले व सर्वांचे आभार शाळेचे मुख्याध्यापिका सौ साधना शिवाजी शिंदे यांनी मानले.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *