शिक्षण सप्ताह निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व आधार फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

613

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : विद्याधाम प्रशाला शिक्रापूर येथे आज शिक्षण सप्ताह निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे व सामुदायिक स्नेह भोजनाचा कार्यक्रम तसेच आधार फाउंडेशन शिक्रापूर तर्फे इ.५/८ वी शिष्यवृत्ती परीक्षा ,एन.एम.एम.एस.परीक्षा तसेच १० वी १२ वी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांंचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य गुरुवर्य नंदकुमार निकम सर, आधार फाउंडेशन चे अध्यक्ष मा.उपसरपंच सुभाषमामा खैरे, विद्यमान उपसरपंच सौ.सारीकाताई उत्तमराव सासवडे, प्राचार्य सोनबापू गद्रे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मंगेश शेंडे, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष श्री.गणेश चव्हाण, व्यवस्थापन समिती सदस्य श्री.सुरेश खुरपे, उपप्राचार्य सुरेश गंगावणे सर, पर्यवेक्षक श्री.मेरगळ सर आधार फाउंडेशन च्या उपाध्यक्षा सौ. पल्लवी महेंद्र हिरवे , सचिव श्री.गणेस रामचंद्र गायकवाड आणि आधार फाउंडेशनचे सर्व कार्यकारिणी सदस्य,प्रशाला शिक्षण सप्ताह चे समन्वयक प्रा.नानासाहेब गावडे सर तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाषमामा खैरे यांनी आपल्या फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली तर सचिव निकम सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आधार च्या कार्याचा गौरव केला. उपसरपंच सारीकाताई सासवडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच व्यवस्थापन समिती सदस्य श्री.श्रीपती भुजबळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अध्यापकांचा खास भेट देऊन सन्मान केला. यानंतर शिक्षण सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यानंतर विद्यार्थ्यांनी सुरुची सामुदायिक भोजनाचा आस्वाद घेतला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ज्ञानेश्वर कुंभार सर यांनी केले तर आभार श्री.गणेश मांढरे सर यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *