यशश्री शिंदे वरील अत्याचाराच्या निषेधार्थ कवठे येथे कॅन्डल मार्च – गुन्हेगाराला फाशीची शिक्षा हवी – ग्रामस्थांची मागणी 

889

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – उरण येथे राहणाऱ्या यशश्री शिंदे हिच्या मृत्यूचे पडसाद राज्यात  ठिकठिकाणी उमटत आहेत.यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची विकृत बुद्धीने अमानुष हत्या करण्यात आली.या आपल्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ग्रामस्थांनी काल सोमवार दि.२९ रोजी सायंकाळी एकत्र येऊन कॅन्डल मार्च काढत तीव्र निषेध व्यक्त केला.याप्रसंगी ग्रामस्थांनी एकत्र येत मेणबत्ती पेटवून गावातून मुक मोर्चा काढला.यशश्री शिंदे ला न्याय मिळालाच पाहिजे, गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे अशा स्वरूपाची मागणी केली.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,युवक या निषेध रॅलीत सहभागी झाले होते.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्या डॉ. कल्पना पोकळे,उद्योजक बाळासाहेब डांगे,सामाजिक कार्यकर्ते किसन हिलाळ,माजी सरपंच दीपक रत्नपारखी,चेअरमन साहेबराव कांदळकर,माजी चेअरमन बबनराव इचके,उपसरपंच मधुकर रोकडे,राष्ट्रवादीचे गटअध्यक्ष राजेंद्र सांडभोर,अविनाश पोकळे, मिठठूलाल बाफना,आबा वागदरे,शरद साळवे,रितेश शहा,डॉ.विजय वागदरे,सोपान वागदरे,केतन माटे,पांडुरंग भोर,सावंत बाई,कुळके काकी आदि ग्रामस्थ,तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *