पातूर,अकोला :पातूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा.शेतकरी जागरमंचचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न

579

  पातूर,अकोला : पातूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणी साठी पातूर तालुका शेतकरी जागरमंचच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर नुकतेच धरणे आंदोलन संपन्न झाले. अकोला जिल्ह्यातील पातूर तहसील कार्यालयासमोर दि.21 डिसेंबर रोजी शेतकरी जागर मंचच्या वतीने पातूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणे व विविध मागण्यांसाठी, एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या वेळी विविध पक्षाचे पदाधिकारी व शेतकऱयांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीरामजी सिरस्कार यांच्या उपस्थितीत पातूर तहसीलचे नायब तहसीलदार पंडित खुळे यांना निवेदन दिले.  शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनामधे पातूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना योग्य दाबाची वीज सलग आठ तास देण्यात यावी,तालुक्यातील मुद्रा लोनची प्रकरणे तात्काळ निकाली काढावी,सिंचन विहीर फळबाग योजनेचे अनुदान लाभार्थ्यी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे,या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

        या वेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे,आमदार सिरस्कार यांनी मार्गदर्शन केले.या वेळी गजानन हरणे, माजी नगराध्यक्ष हिदायतखा,परशराम उंबरकार विजय काळपांडे, विजय बोचरे,सुरेंद्र उगले,विलास देवकर,गजानन गाडगे,आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– प्रतिनिधी,श्रीधर लाड,(सा.समाजशील,पातूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *