मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील अंतर्गत रस्त्याची वाताहात, राज्यात रस्त्यांचा विकास रस्त्याविना गाव मात्र भकास

607
          मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यात रस्त्याचे जाळे होणार, हा मार्ग तो मार्ग, हा संपुर्ण रस्ता कॉक्रीटीकरण होणार अश्या बाता आता प्रत्येक भाषणात राजकिय व्यासपिठीवर येत असताना तालुक्यातील गवाळी, शिरवली – ऱावगाव, सासणे -म्हाडस -केदुर्ली, कोलठण, माजगाव, आंबाटेबा खेडले- तळवली ,किसळ साखरे शिरगाव -वाघीवली, धसई -अल्याणी, बांधिवली-घागुर्ली-आंबेगाव-बोरवली -म्हसा, बांगरपाडा-सासेपाडा- तुळई  या रस्त्याची झालेली वाताहात व  दुरावस्था मुळे गावाला जाणे व येणे कठीण झाले आहे.
          कल्याण -माळशेज राष्ट्रीय महामार्ग 61 हा चारपदरी होणार,नाशिक- शहापुर -मुरबाड -पुणे हा महामार्ग होणार तर हे मार्ग सिमेटकॉक्रीट चे होणार करोडोचा निधी मुरबाडसाठी खर्च होत असल्याची माहीती नागरिकांपुढे येत असताना व शहराना जोडणारे रस्ते विकसित होत असताना गावागावाला जोडणारे रस्त्यांची दुरावस्था अर्थात चाळण झाल्याने गावे भकास होत आहेत. रस्त्याच्या दुरावस्थे मुळे काही गावात बस जाणेही बंद होतात तर  यामुळे कामगार, विद्यार्थी वर्गाला पायपीट करुन जावे लागते.  या रस्त्यांची कामे न झाल्यास आगामी निवडणुकीत याचा परिणाम स्थानिक पुढाऱ्याना दिसुन येईल तर काही ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार देखील टाकु शकतो असा इशारा आता मुरबाड तालुक्यातील विविध गावातून देण्यात येत आहे.
 – प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *