मुरबाड,ठाणे : शासकिय भातखरेदी केंद्रावर चोरट्यांचा डल्ला, खरेदी केलेल्या भाताच्या सुमारे सव्वा चार लाख रुपये किमतीच्या शेकडो गोण्या लंपास

1059
           मुरबाड,ठाणे : आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भातावर चोरट्यांनी डल्ला  मारून शेकडो गोणी  लंपास केल्याची प्राथमिक माहिती मंडळाचे सचिव रमेश घावट यानी दिली तर याबाबत टोकावडे पोलिसानी घटनास्थळी  पंचनामा करुन पुढील चौकशी सुरु केली आहे.
           आदिवासी विकास महामंडळ उपविभाग शहापूर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून हमी भावात भात खरेदी केला जातो . मुरबाड तालुक्यात माळ व धसई येथील खरेदी केंद्रात हा भात खरेदी केला जात आहे खापरी येथिल भात खरेदी केंद्रावर 3397 क्विंटल भात खरेदी करण्यात आला होता.  खापरी येथे महामंडळाचे स्वमालकिचे गोडावुन नसल्याने मिळेल त्या ठिकाणी भात खरेदीचे काटे लावले जातात. माळ केंद्रातील भात खरेदी खापरी येथे खरेदी करण्यात आला आहे . गेल्या चार पाच वर्षापासून खापरी येथे भात साठवले जाते. मागील वर्षी खरेदी केलेला भात या वर्षी उचलण्यात आल्याने रिकाम्या झालेल्या गाळ्यात चालु हंगामातील भात खरेदी करून गाळे बंद करण्यात आले होते. या ठिकाणी राञपाळी करीता कर्मचारी अथवा वाॅचमेन नसल्याने ही संधी साधून चोरट्यांनी दिनांक 20 रोजी राञीच्या सुमारास एका गाळ्याचा दरवाजा तोडून त्या मधील शेकडो गोण्या लंपास केल्याचे महामंडळाचे कर्मचारी यांनी सांगितले .अंदाजे किंमत चार लाख पंचवीस हजार रुपये किंमती चा चोरीस गेलेला भात असण्याची शक्यता आहे. याबाबत महामंडळाच्या कर्मचा-यांनी टोकावडे पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून चोरी झालेल्या भाताचा पंचनामा सहाय्यक पोलिस निरिक्षक धनंजय पोरे व पोलीस कर्मचा-यांनी जागेवर जाऊन केला  आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक पोरे करीत आहेत.
 – प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *