मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील शिवळे महाविद्यालयात श्रावण सरी संगितमय कार्यक्रम संपन्न, विद्यार्थी, रसिक झाले मंत्रमुग्ध

2647
         मुरबाड,ठाणे : मुरबाड  तालुक्यातील शांतारामभाऊ  घोलप कला, विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य माविद्यालय शिवळे  येथे  शनिवार दि. ८ संप्टेबर रोजी आयोजित केलेल्या रवींद्र देवकर व श्रेया दळवी यांच्या सुरेल श्रावण सरीच्या गीत मैफलीने विद्यार्थी रसिक वर्ग मंत्रमुग्ध  झाले.
       रविद्र देवकर यांच्या “ओमकार स्वरूपा” या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.” तेजोमय नादभ्रम” ह्या गाण्याने संपूर्ण वातावरण प्रसन्न  झाले होते. तर “रिमझिम गिरे सावंत “या सारख्या एका पेक्षा एक अशा सरस गीतांनी विध्यार्थ्यांची मने जिंकली.
        शिवळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम पाटील, उपप्राचार्य सौ.गिता विशे,शहापुरचे गटशिक्षण अधिकारी आशिष झुंझारराव, माजी विद्यार्थ्यी संघाचे अध्यक्ष यशवंत माळी, कोषाध्यक्ष सुधाकर वाघ, सचिव धनाजी दळवी कार्यक्रमास उपस्थित होते. मनोहर ईसामे, बी.एम.पवार, दिपक घुडे  तसेच प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग तसेच इतर शाळा महाविद्यालयातील शिक्षक या श्रावणधारा संगिताचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनाजी दळवी तर सूत्रसंचालन रुपचंद झुंझाराव, मुकुंद गायकवाड यांनी केले.  मात्र कार्यक्रम जरी माजी विद्यार्थी संघाचा असला तरी अनेक माजी विद्यार्थी महाविद्यालयातील होणाऱ्या  कार्यक्रमाची माहीती मिळत नसल्याने उपस्थिति  दाखवता येत नाही अशी खंत व्यक्त करताना दिसले.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *