मुरबाड,ठाणे : सिध्दगड स्वातंत्र संग्रामाचे साक्षीदार विठ्ठल भागोजी घिगे यांचे आज वयाच्या ८७ व्या वर्षी निधन

559
      मुरबाड,ठाणे : सिद्धगड स्वातंत्र्य संग्रामातील साक्षीदार असलेले बिट्ठल भागोजी घीगे गुरुजी वय ८७ यांचे आज रविवारी ता ९ कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे निधन झाले .
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगडावर हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना वीरगती प्राप्त झाली. त्यावेळी ब्रिटिशांनी या दोघांचे अंत्यसंस्कार सरकारी जागेत करण्यास बंदी घातली.  तेव्हा विठ्ठल घिगे यांचे वडील भागू रावजी घीगे यांनी हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हीराजी पाटील यांच्या प्रेताना आपल्या मालकीच्या जागेत अग्नी दिला होता. या अग्नी दहनाला बिट्ठल घीगे हजर होते. त्यावेळी त्याचे वय १२ वर्षांचे होते. सिद्धगडावर ज्या ठिकाणी समाधी आहे ती जागा घीगे गुरुजी यांनी स्मारक समितीला दिली आहे. सिद्धगड किल्यावर पूर्ण आयुष्य काढणारे घीगे गुरुजी गेल्या काही वर्षा पासून नांदगाव ता कर्जत येथे राहत होते. तर दरवर्षी ते २ जानेवारी या बलिदान दिनी हुतात्म्याना मानवंदना देण्यासाठी येत असल्याचे स्मारक समितीचे सचिव मुरलीधर दळवी यानी सांगितले.घिगे गुरुजींच्या निधना बद्दल सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार सचिव मुरलीधर दळवी यांनी शोक व्यक्त केला आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *