कवठे येमाई,पुणे : शिरूर शहर व तालुक्यात नववर्षाच्या स्वागतास होणाऱ्या बेकायदा पार्ट्यावर कडक कारवाई करा- यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनची मागणी,मनसे विद्यार्थी सेनेचा पाठिंबा

527
         कवठे येमाई,पुणे : शिरूर शहर व तालुक्यात नववर्षाच्या स्वागतास होणाऱ्या बेकायदा पार्ट्यावर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी शिरूर तालुका यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने शिरूर पोलीसांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.तर आता यशस्वीनी महिलांच्या या विधायक उपक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिरूर शहर यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
          यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या सचिव नम्रता गवारे,वैशाली गायकवाड,पुष्पा जाधव, ललिता कुरंदळे,डॉ.वैशाली साखरे,जनाबाई मल्लाव व इतर महिलांनी नुकतेच शिरूर पोलिसांना याबाबत निवेदन दिले आहे. नव वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने अनेक तरुण दारू पिऊन मद्यधुंद होत असतात. अनेकदा त्यातून वादावादी,अपघात घडतात तर अनेकांना जीवावर बेतण्याचे प्रसंग देखील घडतात.त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन धांगडधिंगा घालत  कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या तळीरामांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी महिलांनी निवेदनात केली आहे. नवीन वर्षाच्या स्वागता साठी अनेक तरुण दारूच्या पार्ट्या करतात. तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पडलेला पाश्चात्य पायंडा बंद व्हावा व दारू कायमस्वरूपी हद्दपार व्हावी असा संकल्प यशस्वीनी महिला व अनेक सामाजिक संघटनांनी केला असल्याचे नम्रता गवारे यांनी सांगितले.तर आज ३१ च्या रात्री व नवं वर्षाच्या प्रारंभी धांगडधिंगा घालणाऱ्यांचा पोलिसांनी कांदा बंदोबदस्त करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. तर महिलांच्या या विधायक उपक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिरूर शहर यांच्या वतीने पाठिंबा कायम मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
– सुभाष शेटे,(कार्यकारी,संपादक,सा.समाजशील



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *