कवठे येमाई,पुणे : शिरूर रामलिंगच्या सहेलि वस्ती शाळेत 31 डिसेंबर मुलांसमवेत उत्साहात साजरा, एड सिमा काशीकर यांच्याकडून मुलांना भोजनाचा आस्वाद

646
         कवठे येमाई,पुणे : आज ३१ डिसेंबर रोजी शिरूर तालुक्यातील जुने शिरूर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित वीटभट्टी कामगार मुलांसाठी चालू केलेल्या सहेलि वस्ती शाळेत 31 डिसेंबर हा दिवस शाळेतील मुलांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील मुलांना एड. सिमा काशीकर यांनी भोजनाचा आस्वाद दिला.
        तर  कु प्रतिमा काशीकर हिने मुलांना पेन्सिल,चॉकलेट दिले,मुलांसोबत सोबत छान-छान गप्पा मारल्या. २०१८ च्या आजच्या शेवटच्या दिवशी मुलांना कपडे,शालेय साहित्य व भोजनाचा स्वाद मिळाल्याने त्यांच्या चेह-यावर  एक वेगळाच आनंद दिसत होता. मुले खुप खुश दिसत होती.मंजू ताई नि दिलेल्या नवीन फळ्यावर मुले मनमुराद लिहीत होती.
        तसेच यांना आज कपडे देखील वाटप करण्यात आले. मुलांच्या या आनंदात काशीकर कुटूंब आणि थोरात कुटूंब सहभागी झाले होते.यावेळी शिल्पा बढे उपस्थित होत्या. मनीषा तरटे यांनी लहान मुलींचे छान कपडे या मुलींना दिले.उपस्थित सर्वांना आज हा दिवस खरच खूप छान वाटत होता.रामलिंगच्या सहेलि वस्ती शाळेत येऊन येथील गरीब विद्यार्थ्यांसमवेत सर्वांनी यथेच्छ आनंद अनुभवला संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.अशाच प्रकारे सर्वांचे सदैव सहकार्य मिळावे त्यामुळॆ या मुलांचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल असे ही कर्डिले यांनी यावेळी आवाहन केले.
– सुभाष शेटे,(कार्यकारी,संपादक,सा.समाजशील



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *