मुरबाड,ठाणे : सिध्दगड स्मारक परिसरात विविध प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सक्त आदेश,सा.समाजशील मधील बातमीचा परिणाम

401
            मुरबाड,ठाणे :  सिद्धगड स्मारक परिसरात विविध प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे सक्त आदेश ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
             मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर 2 जानेवारी 1943 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपलल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीच्या सायंकाळ पासून शाळा कॉलेजचे विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, व शेकडो देशप्रेमी नागरिक येतात सिद्धगड स्मारक समिती तर्फे 1 जानेवारीच्या सायंकाळ पासून विविध देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जातात 2 जानेवारीच्या सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हुतात्मा ज्योत पेटवून श्रद्धांजली अर्पण केली जाते.
             मात्र तेथे पुरेशा भौतिक सुविधा,पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने लोकांची गैरसोय होत आहे याबाबत लोक नाराजी व्यक्त करत होते तसेच या बाबत सा.समाजशील मधून परखड व सविस्तर वृत्त देण्यात आले होते.
            या गोष्टींची दखल घेऊन पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी गुरुवारी ता 27 ठाणे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत देशा साठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारका साठी अभयारण्याचे कायदे अडसर ठरत असतील तरी सुद्धा त्यावर मार्ग काढून आपण तेथे येणाऱ्या लोकांसाठी सुविधा दिल्याचं पाहिजेत अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. या बैठकीस ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार,सिद्धगड स्मारक समितीचे सचिव मुरलीधर दळवी उपस्थित होते.
           अभयारण्यात डांबरी रस्ता करता येत नसेल तर खडी, मुरूम टाकून पक्का रस्ता तयार करा मला या रस्त्यात एकही खड्डा दिसता कामा नये असे सक्त आदेश त्यांनी दिले. मी स्वतः 1 जानेवारीला तेथे येऊन रस्त्याची पाहणी करीन असेही त्यांनी सांगितले.  कायम स्वरूपी शौचालय बांधता येत नाही ही अडचण असली तरी तेथे मोबाईल शौचालये उपलब्ध करून द्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्या असेही बजावत वीज पुरवठा करण्यासाठी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फर्मावले या सर्व कामांसाठी वाटेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी सांगितले.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड,ठाणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *