मुरबाड,ठाणे : मुरबाड मध्ये राजकिय गतिविधि वेगात, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक उमेदवारांचे संपर्क आभियान सुरु

411
          मुरबाड,ठाणे : मुरबाड विधानसभा व भिंवडी लोकसभेच्या निवडणुकीची गतिविधि जोरात सुरु असुन नव्या विविध पक्षाच्या ईच्छुक उमेदवाराचे  संपर्क आभियान सुरु झाले आहे. मुरबाड विधानसभा हे जातीचे कार्ड घेवुन चालते तर  भिवंडी लोकसभा हा पक्षीय ताकदीवर चालते यात सामन्य कार्यकर्त्यावर राजकिय भविष्य अवलंबुन असताना ईच्छुक उमेदवार गावागावत जावुन पुढील वाटचाली साठी आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
           नुकताच विद्यमान  भाजपचे खासदार कपिल पाटील हे कॉग्रेस मध्ये येणार अशी चर्चा असुन त्यावर पाटील यांच्याकडुन मौन पाळले जात असताना राजकिय गोपनियता असल्याचे बोलले जात आहे.  कॉग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे हे हि ईच्छुक असल्याचे समोर येत असताना राजेश घोलप हे देखिल खासदारकी साठी दावेदारी करत आहेत.त्यामुळे कॉग्रेस मधिल रस्सी खेच पहाता भाजप व शिवसेना हि तयारीत आहे.तर मुरबाड विधानसभेसाठी भाजपचे राजेश पाटील,शिवसेनेचे शैलेश वडनेरे, तर   राष्ट्रवादीतुन  सुभाष पवार हे उमेदवार असतील अशी चर्चा आहे, विद्यमान भाजप खासदार कपिल पाटील हे कॉग्रेस मध्ये आल्यास विद्यमान आमदार किसन कथोरे खासदारकी व त्याचे निकटवर्ती  राजेश पाटील हे विधानसभा लढवतील यातुन कुणबी व आगरी कार्ड सोबत भाजप तयारीत असल्याचे दिसते. यामुळे कॉग्रेसचे नेते व कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील हे देखिल खासदारकी साठी ईच्छुक असल्याने कॉग्रेस व भाजपात उमेदवारीसाठी मोठ्या बेडुक मारणाऱ्याची संख्या वाढणार असल्याचेही दिसत आहे.  तर राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये खुली उमेदवारी असल्याने राजकिय स्वार्था साठी  कुणीही येवुन बाजी मारु शकतो. कारण राष्ट्रवादी  कॉग्रेस चे माजी आमदार यांचे आजही मोठ्याप्रमाणात चहाते असल्याने  गोटीराम पवार हे 2019 च्या लोकसभा व विधानसभा  निवडणुकीतील हुकुमाचा पत्ता असल्याची चर्चा सुरु आहे, विद्यमान खासदार कपिल पाटील हे गोटीराम पवार यांच्यामुळेच निवडुन आल्याचे राजकिय वर्तुळात माहीत असल्याने  राष्ट्रवादीची  आघाडी कुणासोबत होते तसेच भाजप व शिवसेना यांच्यात युती  होते का  या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे, मुरबाड मध्ये शिवसेनेचे दोन उघड गट असल्याने बदलापुर चे नगरसेवक शैलेश वडनेरे  हे सर्वाना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.त्यामुळे मुरबाड विधानसभा व भिंवडी लोकसभा यांच्यातील चुरस आतापासुन सुरु आहे. पालकमंत्री  एकनाथ  शिंदे शिवसेना व  राष्ट्रवादी कॉग्रेसचे गोटीराम पवार हे  हुकामाचे पत्ते असल्याने यांची कृपादृष्टी कुणावर होणार यावर निवडणुकीची चुरस ठरणार आहे. विकासाचा मुद्दा, नगरपंचायतीचा भ्रष्टाचार,  तालुक्यातील खड्डेमय रस्ते हे प्रमुख मुद्दे अति चर्चेत येत असताना. मनसे पक्ष दोन्ही जागा लढवते कि  कुणाला पांठीबा देतील. हाही चर्चेचा विषय ठरला आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड,ठाणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *