संभाजी महाराज जयंती निमित्ताने गार अकोले तालुका माढा येथे कुस्त्यांचा जंगी आखाडा

466

नीरा नरसिंहपूर, ता. इंदापूर (  -प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार ) :  संभाजी महाराज जयंती निमित्ताने गार अकोले तालुका माढा येथे कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. एक नंबरची कुस्ती मैदानामध्ये संतोष दोरवड कोल्हापूर तालीम विरुद्ध विजय धुमाळ शिवनेरी तालीम अकलुज लावलेल्या कुस्तीमध्ये संतोष दोरवड पहिलवान विजय झाला.  गार अकोले तालुका माढा येथील माजी सरपंच जितेंद्र गायकवाड व त्यांचे बंधू बजरंग आखाडा वस्ताद, अण्णासाहेब गायकवाड या दोन बंधूंच्या प्रयत्नातून सालाबाद प्रमाणे तिसऱ्यांदा कुस्ती मैदान आखाडा भरविण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माढा तालुक्याचे आमदार बबन शिंदे, सभापती अप्पासाहेब जगदाळे, सभापती पुणे जिल्हा जिल्हा परिषद प्रवीण माने, सभापती विक्रम शिंदे, बबन पाटील, रावसाहेब मगर, अमर जगदाळे, संजय बोडके, हरिदास घोगरे, शरद जगदाळे, प्रवीण बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत कुस्त्याचा आखाड्याला शोभा आली. बजरंग आखाड्याचे वस्ताद अण्णासाहेब गायकवाड यांना संचालक रावसाहेब मगर यांनी मानाचा फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला.  सालाबाद प्रमाणे कुस्ती मैदान बनवल्या बद्दल प्रेक्षकांनी तसेच पैलवानांनी आनंद व्यक्त केला.  कुस्ती निवेदक म्हणून शंकर पुजारी कोल्हापूर, युवराज केचे गार अकोले यांनी काम पाहिले तर, उपस्थित वस्ताद असलम काजी, रावसाहेब मगर, क्ष्‍मण गावडे, देविदास गलांडे, महादेव ठवरे, बाळासाहेब चौरे व कुस्ती आखाडा मध्ये पंच म्हणून लाभलेले अण्णासाहेब गायकवाड, रावसाहेब मगर, लक्ष्‍मण गावडे, सुनील बोडके, हरिदास वाळेकर, अमर जगदाळे, कमाल जमादार, युवराज केचे यांनी देखील काम पाहिले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक नामांकित पैलवान उपस्थित राहून कुस्ती शौकिनांचे मने जिंकली.  50 रुपयांपासून १ लाखा पर्यंत कुस्त्या आखाड्यात लावण्यात आल्या. कुस्ती आखाड्यात ४७५ कुस्त्या लावण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात पैलवानांना मानधनही देण्यात आले. टेंभुर्णी तालुका माढा येथील पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला होता.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *