सणसवाडीच्या उपसरपंचपदी गणेश दरेकर यांची बिनविरोध निवड

385

सणसवाडी ता.शिरूर (-प्रतिनिधी, ज्ञानेश्वेर मिडगुले) : सणसवाडी येथील उपसरपंच नवनाथ भुजबळ यांनी राजीनामा दिल्या मुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत गणेश काळुराम दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. गणेश दरेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने व बहुसंख्य सदस्यांचा पाठींबा असल्याने निवडणुक अधिकारी ग्रामसेवक पवने यांनी बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी सरपंच रमेश सातपुते, माजी सरपंच वर्षा गणेश कानडे, माजी उपसरपंच नवनाथ भुजबळ, बाबासाहेब दरेकर, युवराज दरेकर, सुनिता रामदास दरेकर, ग्रामपंचायत सदस्या ललिता संदिप भुजबळ व ग्रामस्थ उपस्थित होते . रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज दरेकर यांनी निवडीनंतर गणेश दरेकर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या .




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *