राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

560
         कोरेगाव भीमा,शिरूर : (रिपोर्ट,सुनिल भंडारे) – वाघोली येथे हॉटेल यशराज इनमध्ये पार पडलेल्या राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या पुणे जिल्हास्तरीय पदाधिकारी निवड,पत्रवाटप,स्मार्ट ओळखपत्र वाटप समारंभामध्ये पुणे जिल्हास्तरीय निवडी जाहीर करण्यात आल्या.तसेच या पत्रकार परिषदेच्या सलग्न असणाऱ्या महिला मंचच्या पुणे जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.यामध्ये राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हाध्यपदी विजय लोखंडे तर महिला मंचच्या जिल्हाध्यक्षपदी अर्चना सोनवणे यांच्या जाहीर निवडीचा समारंभ पार पडला.यामध्ये राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे व राज्य पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष सुनील थोरात,दैनिक पुण्यनगरी पेपरचे आदर्श उपसंपादक अशोक बालगुडे,माहिती सेवा समितीचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या हस्ते सर्व जिल्हा पदाधिकारी यांना निवडीचे पत्र व स्मार्ट ओळखपत्र प्रदान करण्यात आले.याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे संघटक संदिप जाधव आदी पत्रकार उपस्थित होते.
          कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे म्हणाले,पत्रकारांची नोंदणी शासन दरबारी असणे आवश्यक असणे गरजेचे असून ग्रामीण व शहरी भागात पत्रकारिता करणारे प्रत्येक वृत्तपत्राचे प्रतिनिधी हे मुक्त पत्रकारिता करतात. पत्रकार म्हणून जरी तो सर्वदूर मिरवत असला तरी त्याची व शासन दरबारात कुठेही नोंद नाही ती नोंद होणे गरजेचे आहे त्याशिवाय त्याला शासनाच्या कोणत्याही सवलती किंवा लाभ मिळने शक्य नाही.पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी पत्रकारांची शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यात नोंदणी करून घेण्याचे मानस राज्य मराठी पत्रकार परिषदेने योजिले असून सर्वांनी यासाठी एकत्र येण्याची व संघटित होण्याची गरज आहे.तसेच पत्रकारांसोबत खांद्याला खांदा लावून लढा देणाऱ्या महिलांसुद्धा त्याच्या हक्काचे व्यासपीठ पत्रकारांच्या माध्यमातून उभे करण्याचे व त्यांना हक्क मिळवून देण्याचे काम संघटनेच्या महिला मंचच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी शेवटी बोलताना सांगितले.
राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश जिल्हास्तरीय जाहीर केलेल्या निवडी 
पुणे जिल्हाध्यक्ष-विजय लोखंडे,कार्यध्यक्ष गजानन गव्हाणे,उत्तर जिल्हा उपाध्यक्ष-सुनील भंडारे, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष नितीन करडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख-विजय हडवळे,शिरूर तालुकाध्यक्ष धर्मा मैड,हवेली तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटेकर,शिरूर ता.उपाध्यक्ष प्रमोद कुतवळ,शिरूर ता.कार्यध्यक्ष विठ्ठल गवळी,शिरूर ता.सचिव शंकर पाबळे,आदी पत्रकार यांच्या सभासद नोंदणी करण्यात आल्या.
राज्य मराठी पत्रकार परिषद सलग्न जिल्हा महिला मंच
 पुणे जिल्हाध्यक्ष अर्चना सोनवणे,संपर्क प्रमुख अर्चना सरोदे,उपाध्यक्ष सुजाता काटे,संघटक अर्चना म्हाळसकर,पिंपरी शहराध्यक्षा रेश्मा लिंमकर,हडपसर शहर अध्यक्षा दिपाली नलावडे,श्रद्धा देशमुख,नेहा गराडे,अर्चना खोंड,आशा बोरकर,मुमताज शेख.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *