मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मुरबाड मध्ये तरुण वर्गाचा मनसेत प्रवेश 

563

मुरबाड (-प्रतिनिधी,जयदीप अढ़ाईगे) : मुरबाड मध्ये विविध पक्षात काम करणाऱ्या तरुण वर्गाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुरबाड मनसेत इन कमिंग तरुण वर्गामुळे शहरात तसेच मतदारसंघात ताकद वाढत असल्याचे  शहराध्यक्ष नरेश देसले यांनी यावेळी सांगितले. या प्रवेशा नंतर मुरबाड तालुका अध्यक्ष कैलास चौधरी यांच्या नेतृत्वा खाली म्हसा आणि मुळ्याचा पाडा शाखांचे उदघाटन ठाणे- पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या. 150 कार्यकर्त्यांसह तालुक्यातील नावाजलेल्या  किसन कथोरे मित्र मंडळाच्या अनेक सदस्यानी मनसे मध्ये जाहीर प्रवेश केल्याने या प्रवेशाचा मोठा फायदा मनसेला होणार आहे. यावेळी तालुका सचिव विलास चौधरी व शहर अध्यक्ष नरेश देसले सर्व तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. शिवाजी वारघडे – तालुका उपाध्यक्ष ( माळ गट),  ज्ञानेश्वर कुर्ले – मनसे, तालुका उपाध्यक्ष (शिरवली गट). अजीज शेख,चंद्रकांत वारघडे, घागस, विकास चौधरी,नंदू गायकर, राहुल गोडांबे,दीपक दळवी यांच्या निवडी जाहीर करण्यात आली.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *