जि.प. शाळाच्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत ‘शाळाबाह्य’ विध्यार्थी खेळवले : शिक्षण विभागाकडे तक्रार

502

पंचायत समिती शिक्षण विभागाकडे तक्रार : तक्रारी कडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

मुरबाड, जि.ठाणे (-प्रतिनिधी -जयदीप अढाईगे): मुरबाड तालुक्यातील जि .प. शाळांच्या तालुकास्तरीय  क्रिडा स्पर्धा तालुक्यातील सरळगाव येथे १९ डिसेंबर २०१९ रोजी खेळवल्या गेल्या या स्पर्धेत तालुक्यातील सर्व केंद्रांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतून जिल्हा पातळीसाठी निवड होणार होती. मात्र यासाठी आपल्याच शाळेची निवड व्हावी यासाठी सर्व शाळा प्रयत्नशील असताना तालुक्यातील खेवारे -महाज  जि .प .शाळेने शाळेबाहेरील  विध्यार्थी खेळवून तालुका स्पर्धा जिंकली. या शाळा बाह्य खेळाडू मुळे शालेय विद्यार्थी वर्गात नाराजी व्यक्त होत असून, विद्येच्या माहेरात अश्या घृणास्पद गोष्टी मुळे शिक्षण क्षेत्रात विश्वास अर्हता गमावले असल्याचे शिक्षक वर्गातून बोलले जात आहे. याबाबत तालुक्यातील पाटगाव व दुधाळेपाडा (शास्त्री नगर) या शाळांनी याची लेखी तक्रार पंचायत समिती मुरबाड शिक्षण विभागाकडे करून खेवारे महाज या शाळेचे विजेते पद रद्द करून मुळ विध्यार्थी असलेल्या संघांना जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी पाठवण्याची मागणी केली. मात्र या तक्रारीकडे पंचायत समिती शिक्षण विभागाने कानाडोळा केल्याचे समोर आले असून, शाळा बाह्य विद्यार्थी खेळवून विजेते पद मिळवणा ऱ्या संघावर कारवाईची मागणी केली आहे. या बाबतीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी  खरपटे  यांच्याशी संपर्क केला असता त्या संपर्क कक्षेत नसल्याचे  सांगण्यात आले .



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *