हस्ती बँक व लायन्स क्लबतर्फे आयोजित रक्तदान शिबीरात ३०० रक्तदात्यांचे रक्तदान !

369
दोंडाईचा- (प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : दि हस्ती को ऑप बँकेच्या ४९ व्या वर्धापनदिन निमित्त हस्ती बँक व लायन्स क्लब दोंडाईचा तर्फे दिनांक १ डिसेंबर २०१९ रविवार रोजी हस्ती पूर्व प्राथमिक स्कूल काराणी ज्ञानदीप, दोंडाईचा येथे हस्ती बँक प्रेसिडेंट  कैलास जैन व व्यवस्थापकिय संचालक प्रकाश कुचेरिया, प्रकल्प प्रमुख ला. संजय सोनार, ला. दिनेश वोरा यांचा मार्गदर्शनखाली रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबीराचे  उद्घाटन हस्ती बैंकेचे व्हा. प्रेसिडेंट पहलाज माखीजा यांचे हस्ते झाले. याप्रसंगी बँकेचे संचालक अँड. अशोकभाई गुजराथी, कैलासचंंद्र अग्रवाल, किर्तीभाई शाह, राजेंद्र चोपडा, मेजर दिलीप वाघेला, पांडुरंग कागणे हे मान्यवर उपस्थित होते. या शिबीरात  दोंडाईचा व परिसरातील महिलांनीही उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. यात तब्बल ३०० रक्तदात्यांचा समावेश आहे !
दि हस्ती को ऑप बँक व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी रक्तदान शिबीर घेण्यात येते. रक्तदान शिबिराचे हे सलग १३ वे वर्ष होते. आत्तापर्यंत अनेक गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात किंवा विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्यात आले आहे. हस्ती बँक बँकिंग सेवे सोबतच सामाजिक दायित्वाच्या भावनेने वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असते. यात वृक्षारोपण, सामाजिक संस्थांना आर्थिक मदत यासह दरवर्षी रक्तदान शिबिराद्वारे गरजू रुग्णांची मदत केली जाते. या सोबतच रक्तदाते व त्यांचे नातेवाईक मित्र यांना कधीही धुळे नाशिक, जळगाव, मुंबई, दोंडाईचा येथे रक्ताची गरज भासल्यास त्यांना सवलतीच्या दरात अथवा आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यास विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
रक्तदानाचे या अमूल्य कार्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला हस्ती बँकेतर्फे एक सप्रेम भेट वस्तू प्रदान करण्यात आली. शिबीर यशस्वी होण्यासाठी नवजीवन रक्तपेढी, निर्णय रक्तपेढी आणि लायन्स क्लब अध्यक्ष ला. राकेश अग्रवाल, सेक्रेटरी ला. व्ही. एम्. पाटील,  ट्रेझरर ला. आशिष अग्रवाल, तसेच किशोर जैन, विशाल सोनार, सुदर्शन देशमुख, हमजा जिनवाला, दिपक घोडके, सचिन अग्रवाल, गौतम माखीजा, चोईथ कुकरेजा,  बी. बी. पाटिल, व लायन्स परिवार सदस्य आणि हस्ती बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *