ब्युला कौलगे यांचा सल्ला; मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘आरोग्यदायी व्यायाम’वर व्याख्यान

996
पुणे (-प्रतिनिधी, सचिन दांगडे)  : बदलत्या जीवनशैलीचे मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळे परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत ताण तणाव दुरु करण्यासाठी तसेच निरोगी आणि सुदृढ राहण्याकरीता नियमित व्यायाम गरजेचे आहे. शाळा-महाविद्यालयातील विदयार्थी, तरुण, नोकरदार, महिला, जेष्ठ सर्वांनीच व्यस्त जीवनशैलीतून व्यायामासाठी थोडा वेळ द्यावा, शरीराची हालचाल होईल असे साधे सोपे व्यायाम प्रकार करावेत,” असा सल्ला सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातील शारिरीक शिक्षण आणि क्रीडा केंद्र सहाय्यक संचालक ब्युला कौलगे यांनी दिला.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या वतीने ‘आरोग्यदायी व्यायाम’ या विषयावर ब्युला कौलगे यांचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले. एसएम जोशी फाऊंडेशनच्या चर्चा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कौलगे यांनी उपस्थितांकडून सर्वांगाची हालचाल होईल अशा साध्या सोप्या व्यायाम प्रकारचे प्रात्यक्षिक करून घेतले. प्रेक्षकांनी देखील उत्साहाने यात सहभाग घेतला. यावेळी मराठी विज्ञान परिषद पुणेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, उपाध्यक्ष डॉ. नीलिमा राजुरकर, विनय र. र, वसंत शिंदे, डॉ. सुजाता बरगले, संजय मा. क यांच्या सह व्यायामाची आवड असणाऱ्यांनी, विज्ञान प्रेमींनी आणि अभ्यासकांनी व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
”तरुण तसेच जेष्ठांमध्ये व्यायाम करण्याबाबत जागृती वाढत आहे. प्रत्येकाची शारीरिक प्रकृती भिन्न असल्याने स्वतःच्या क्षमतेनुसार व्यायाम करावा. माणसाचे वय जस जसे वाढत जाते तस तसे व्यायामाचं महत्त्व अधिक होत जाते. त्यामुळे वयोवृध्दांनी देखील व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामासंबधित विविध मोबाईल ऍप उपलब्ध आहेत, त्याचा वापर होताना दिसून येत आहे. युवा वर्गाने देखील सायकल चालवणे, ट्रेकिंग, नृत्य करणे, योगासने करणे, जिमिंग, पोहणे असे आपल्या आवडीचे कोणतेही प्रकार निवडावेत आणि ते नियमित करावेत, यामधून शरीराची खूप हालचाल होते भरपूर व्यायाम होतो. परंतु एखादी दुखापत झाल्यास व्यायाम ती पूर्ण बरी झाल्याशिवाय व्यायाम करू नये.”
राजेंद्रकुमार सराफ म्हणाले,”तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जसे फायदे झाले तसे तोटे हि झाल्याचे पाहावयास मिळतात. घरातील विविध प्रकारच्या कामे करतांना व्यायाम होत असे, परंतु आता सर्व कामे मशीनद्वारे करण्यात येतात. तसेच बैठेकाम जास्त वाढल्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. याकडे सर्वांनी लक्ष द्वावे. दिवसातील किमान थोडा वेळ व्यायामा करीत द्यावा.”
डॉ. नीलिमा राजुरकर यांनी प्रस्तावना केली.  दीपाली अकोलकर यांनी आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *