कवठे येमाईत आनंदाचा शिधा वाटप सुरु – गौरी-गणपती उत्सवात शिधापत्रिका धारकांना दिलासा 

58
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गणेश माधवराव रत्नपारखी यांच्या शासनमान्य रास्त रेशन दुकानातून यावर्षीच्या गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिका धारकांना ” आनंदाचा शिधा” वाटप करण्यात येत असल्याची माहिती दुकानाचे संचालक तथा स्वस्त धान्य संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष गणेश रत्नपारखी यांनी दिली. तर १०० रुपायात उपलब्ध करण्यात आलेल्या हा आनंदाचा शिधा मिळण्यापासून लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणार असल्याचेही त्यांनी सा.समाजशील सोबत बोलताना सांगितले.
         तर रत्नपारखी यांच्या दुकानात १३२० शिधापत्रिका धारक असून ११५८ कार्डधारकांचा शिधा उपलब्ध झाला आहे. सर्व शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देताना चालू महिन्याचा आनंदाचा शिधा  शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यास सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले.शासनाकडून प्राप्त रवा,साखर,डाळ,तेल प्रत्येकी एक किलो प्रमाणात शिधापत्रिका धारकांना देण्यास सुरुवात करण्यात आली.अनेक शिधापत्रिका धारक उपस्थित होते.नागरिकांनी लवकरात लवकर आपला शिधा घेऊन जाण्याचे आवाहन ही रत्नपारखी यांनी केले आहे.
         शिंदे – फडणवीस -पवार सरकारने सर्व सामान्य नागरिकांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंद द्विगुणीत झाल्याची भावना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिठूलाल बाफना,बाळासाहेब डांगे,बाजीराव उघडे व अनेकांनी व्यक्त केली. यावेळी समाजशील न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक तथा युवा क्रांती पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रसिद्धी प्रमुख,मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे,सामाजिक कार्यकर्ते विलासराव रोहिले,मच्छिंद्र बोऱ्हाडे,किशोर गोसावी,शितोळे,भोर,महेश उघडे व अनेक मान्यवर ग्रामस्थ,शिधापत्रिका धारक उपस्थित होते.गणेश रत्नपारखी यांच्या रास्त भाव दुकानातून सातत्याने उत्कृष्ट सेवा मिळत असल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

     सुरेश मुंढे – पूर्व नायब तहसीलदार,पुरवठा विभाग,पुणे 

      मागील सण, उत्सवा दरम्यान पुणे जिल्ह्यात वितरित करण्यात आलेले आनंदाचा शिधा संच बऱ्याच अंशी शिल्लक राहिल्याने शासनाकडून परिपत्रकाद्वारे आवश्यक त्या संचांची सप्टेंबर २४ साठी मागणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या नुसार मागणी करण्यात आली.गरज वाटल्यास निवडणुकीची अधिसूचना लागण्या अगोदर शासनाकडे आनंदाचा शिधा संचांची मागणी नोंदविण्यात येईल
     दीपक केदार – पुरवठा निरीक्षण अधिकारी,शिरूर 
 गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाकडे ५४,६०० आनंदाचा शिधा संचाची मागणी करण्यात आली होती. तथापी माहे सप्टेंबर २४ साठी शासनाकडून शिरूर तालुक्यात वितरणासाठी ४७,७०० आनंदाचा शिधा संच प्राप्त झाले. सर्व संच तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात पाठविण्यात आले असून संचाचे वितरण ही सुरळीत सुरु आहे. शिधापत्रिका धारकांनी आपला आनंदाचा शिधा लवकरात लवकर घेऊन जाण्याचे आवाहन तालुका पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *